टीव्ही विश्वातील मालिकांचे प्रेक्षक चाहते असतात. अनेक मालिका या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांची मन जिंकत अविरतपणे त्यांचं मनोरंजन करत आहेत. टीव्ही विश्वातील अशीच एक मालिका जी गेली अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. ही मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या हिंदी मालिकेने विवधि भाषी प्रेक्षकांना तिच्या कथानकाने जोडून ठेवलं आहे. आशयघन कथानक, विविध सामाजिक मुद्दे घेऊन येत ही मालिका नेहमीच रसिकांच्या मनावर राज्य करताना दिसत असते. या मालिकेतील कलाकारही प्रेक्षकांचे आवडते आहेत. (Munmun Dutta Income)
या प्रसिद्ध मालिकेतून ही कलाकार मंडळी घराघरांत पोहोचली. या मालिकेमुळे लोकप्रियता मिळवलेली एक अभिनेत्री म्हणजे मुनमुन दत्ता. मुनमुन दत्ता हिला या मालिकेमुळे सर्वाधिक ओळख मिळाली. सोशल मीडियावर ही अभिनेत्री बऱ्यापैकी सक्रिय असते. सध्या अभिनेत्रीला इंस्टाग्रामवर ८.१ मिलियन लोक फॉलो करत आहेत. मुनमुन दररोज इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
रिपोर्ट्सनुसार, मुनमुन दत्ता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेसाठी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. वयाच्या १७व्या वर्षी मुनमुनने अभिनय विश्वात पाऊल टाकलं. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘बबिता जी’ची भूमिका साकारणारी मुनमुन एका एपिसोडसाठी ५० ते ६५ हजार रुपये घेते, असे अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. या शोमध्ये अभिनेत्री ‘बबिता अय्यर’ची भूमिका साकारत आहे, जी ‘कृष्णन सुब्रमण्यम अय्यर’ची ऑनस्क्रीन पत्नी आहे.
टीव्ही विश्वात काम करण्याबरोबरच मुनमुन दत्ता अनेक ब्रँडसाठी काम करताना दिसते. याशिवाय, ती बऱ्याच जाहिरातींमध्ये देखील दिसली आहे. या जाहिरातींसाठीही तिने मोठं मानधन आकारलं आहे. अभिनेत्री मुनमुन दत्ता यूट्यूबवर खूप सक्रिय आहे. युट्युबच्या माध्यमातूनही ती वर्षाला करोडो रुपये कमावते. तिच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, मुनमुनची एकूण संपत्ती सुमारे ३० कोटी रुपये इतकी आहे.