हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्री मधुबाला यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. १४ फेब्रुवारी १९३३ रोजी मधुबाला यांचा जन्म झाला. मुमताज जहान बेगम नहलवी हे त्यांचं खरं नाव . त्यांनी साकारलेली ‘मुघल-ए-आझम’ या अजरामर चित्रपटातील ‘अनारकली’ भूमिका आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. याबरोबरच त्यांनी ‘मिस्टर अँड मिसेस ५५’, ‘चलती का नाम गाडी’, ‘काला पानी’, ‘हावडा ब्रिज’,’नील कमल’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. त्यांच्या सर्वच भूमिकांना प्रेक्षकांचे भरघोस प्रेम मिळालं आहे. (Madhubala Biopic)
मधुबाला यांनी हिंदीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेते दिलीप कुमार व त्यांच्या प्रेमाची चर्चा सर्वत्र होत होती. मात्र काही कारणांमुळे ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर त्यांनी अभिनेते किशोर कुमार यांच्याबरोबर १९६० साली लग्न केले. पण वयाच्या अवघ्या ३६व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ‘ज्वाला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट असून अभिनेते सुनील दत्त यांच्याबरोबर त्या दिसल्या होत्या. पण आता पुन्हा त्यांना पडद्यावर बघण्याची संधी मिळणार आहे. मधुबाला यांच्या जीवणार बायोपिक तयार होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
दिग्दर्शक जसमित के रीन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचेही समोर आले आहे. याआधी जसमितने आलिया भट्ट व विजय वर्मा यांचा ‘डार्लिंग्स’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. मधुबाला यांच्या बायोपिक सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शन व Brewing Thoughts Pvt. Ltd यांनी इन्स्टाग्राम पोस्ट करत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाची निर्मिती मधुबाला यांची बहीण मधुर ब्रिज भूषण व अरविंद कुमार मालवीय करणार आहेत.
आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मधून किती कमावते बबिता?, मुनमुन दत्ताचं एका एपिसोडचं मानधन आहे तब्बल…
मधुबाला यांच्या बायोपिकची घोषणा होताच चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच मधुबाला यांच्या भूमिकेसाठी कोणाची निवड करण्यात यावी याबद्दलही मतं मांडण्यात आली आहेत. काहींनी अभिनेत्री आलिया भट्टचे नाव घेतले आहे तर काही जणांचे म्हणने आहे की या भूमिकेसाठी दक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टीची निवड करण्यात यावी. मात्र बरेच जणांनी अभिनेत्री मृणाल ठाकूरचे नाव घेतलं आहे. अनेकांनी ‘सीतारमण’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेची सांगड मधुबाला यांच्याशीही घातली आहे. पण आता मधुबाला यांच्या भूमिकेसाठी कोणाची निवड होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.