गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सातासमुद्रापार ४५ वर्षं राहूनही…”, परदेशात मराठी गृहस्थाला भेटून संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणाला, “निघतांना घट्ट मिठी मारली…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 19, 2025 | 10:29 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sankarshan Karhade Fan Moment

"सातासमुद्रापार ४५ वर्षं राहूनही…", परदेशात मराठी गृहस्थाला भेटून संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणाला, "निघतांना घट्ट मिठी मारली…"

Sankarshan Karhade Fan Moment : सध्या सिनेविश्वात नाटकांचा कल अधिक वाढला आहे. कलाकार मंडळी या नाटकांचे दौरे घेऊन आता परदेश दौरा करताना दिसत आहेत. परदेश दौऱ्यादरम्यान या कलाकारांच्या अनेक फॅन मुमेंट ते नेहमीच शेअर करतात. यापैकी एक कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. संकर्षण कऱ्हाडे सध्या नाटकांच्या प्रयोगाकरिता अमेरिका दौरा करण्यात व्यस्त आहे. या अमेरिका दौऱ्यात अभिनेत्याला एक विलक्षण व्यक्ती भेटली आणि त्याने या विलक्षण व्यक्तीबरोबरचा विलक्षण अनुभव शेअर केला आहे. संकर्षणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या खास भेटीमागचा अनुभव शेअर केला आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेत ४५ वर्ष स्थायिक असलेल्या व्यावसायिक सुदर्शन साठे यांची भेट घेतली. ही भेट संकर्षणसाठी अधिक खास होती हे त्याने पोस्टद्वारे सांगितलं आहे.

संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट
#मराठी आणि #महाराष्ट्र मनांत घेऊन अमेरिकेत फिरणारं सुदर्शन चक्र. नाटकाच्या निमित्ताने जगाच्या पाठीवर वेगवेगळी माणसं भेटतात. या अमेरिका दौऱ्यात क्लिव्हलंड शहरांत सुदर्शन साठे भेटले. काय, किती आणि कसं बोलायचं यांच्याविषयी?. आधी भौतिक श्रीमंती सांगतो, म्हणजे तुमचा वाचण्यातला ईंटरेस्ट वाढेल. फूटबाॅल ग्राऊंड पेक्षा दोन पावलं कमी भरेल इतकं मोठं यांचं घर. घराच्या दाराशी ठेवलेल्या रागावलेल्या सिंहाच्या पुतळ्यापासून ते घराच्या मागे टेनिस कोर्टच्या शेजारी ठेवलेल्या 8 Hours chair, म्हणजे आठ तास बसलं तरी बूडाला आणि बूडाच्या मालकाला कंटाळा येणार नाही अशा खुर्ची पर्यंत सगळं अत्यंत विचारपूर्वक आणि मौल्यवान.

ज्या ज्या महागड्या गाड्या पाहून माझ्यासारख्या मध्यमवर्गीय माणसांच्या भुवया ऊंचावतील त्या त्या सगळ्या गाड्या घरांत. बाहेर पडायचं निमित्त काय आहे त्यानुसार गाडी बदलायची अन् काढायची. 2 BHK फ्लॅटच्या २ बेडरुम मिळून जेवढी जागा असेल तेवढं यांचं कपड्यांचं कपाट. बूट, चष्मा वगैरे यांची व्हरायटी नकोच बोलायला. ऊंची जवळपास सहा फुट. DON मधल्या बच्चन साहेबांच्या रुबाबाला टक्कर देणारी यांची चाल अन् स्टाईल.

आणखी वाचा – “कॅन्सर सर्जरीदरम्यान रुहानला स्तनपान करण्यापासून रोखणं होतं कठीण”, दीपिका कक्करचा खुलासा, म्हणाली, “अनेक रात्री…”

आता खरी श्रीमंती. श्रीमंती क्रमांक दोन सांगतो. नीट वाचा. समर्थ रामदासांचा दासबोध, भगवत् गीता, रामायण, महाभारत, संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या, संत तुकारामांचे अभंग या सगळ्यांचा प्रचंड अभ्यास आणि तोही पाठांतरासहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्याविषयी खूप आदर, अभ्यास. महाराष्ट्रात राहुन आपण तरी काय शुद्ध बोलतो अशी स्वच्छ मराठी. भारत देशाबद्दल प्रचंड अभिमान. देशांतर्गत मुद्दे, महाराष्ट्र, राजकारण, खेळ, कला या सगळ्यविषयीची ऐकीव नाहीतर अभ्यासलेली माहीती, प्रचंड वाचनातून आलेलं ज्ञान, वागायला अत्यंत नम्रं. प्रत्येकाचं म्हणणं शांतपणे ऐकायची तयारी. ४५ वर्षं अमेरिकेत खूप कष्टं करुन कमावलेली माणसांची, विचारांची, ज्ञानाची श्रीमंती. त्यांनी विचार करुन, प्रत्येक शब्दाचा मान राखून बोललेल्या प्रत्येक वाक्यांत आयुष्याचं सार सापडावं असे मुद्दे.

मी विस्मयचकीत झालो, भारावलो, सुखावलो आणि काय काय झालो. त्यांना त्यांचे आई-वडील, आई वडीलांनी दिलेली शिकवण आणि केलेल्या संस्कारांची स्वत:च्या वयाच्या सत्तरीनंतरही ताजी आठवण आणि जाण. बायकोविषयी प्रचंड आदर आणि प्रेम. जगांतल्या सगळ्याच नवऱ्यांना पटत नाही तसा त्यांना जरी त्यांच्या बायकोचा मुद्दा नाही पटला तरी, सांगायची पद्धत सुद्धा फार आदर देणारी. आणि कितीही व्यस्तता असली तरी रोज त्यांच्या ठरलेल्या गजानन महाराजांच्या पोथीतला एक अध्याय वाचण्यावरची त्यांची श्रद्धा, देवावरचा प्रचंड , दृढ विश्वास. श्रीराम, श्रीकृष्ण यांना आलो तुमच्या पायाशी म्हणुन लीन झालेलं त्यांचं अंतःकरण.

आणखी वाचा – दीड वर्षांनी केस वाढले आणि…; कॅन्सरवरील उपचाराच्या वेदना असूनही हिना खानच्या चेहऱ्यावर आनंद, सगळ्यांचेच डोळे पाणावले

कुणालाही कुठल्याही तराजूमध्ये नं तोलणारी, सगळ्यांशी एकसारखी वागायची त्यांची पद्धत. समोरच्याला सतत आनंद देण्याचा, त्यांच्या ज्ञानात, माहितीमध्ये भर घालणारा त्यांचा दानशूरपणा. आणि हे सगळं त्यांच्याकडे असतानाही मी त्यांच्यासमोर पहिल्यांदा आलो तेव्हा माझा हात हातात घेऊन मला म्हणाले, “सरस्वतीचा आशीर्वाद असलेल्या माणसाचा स्पर्श झाला. आता मलाही आशीर्वाद मिळेल”. हे ऐकल्यावर मला भारी वाटलं होतं पण, जसा जसा या माणसाचा सहवास लाभला त्यानंतर मात्र माझ्यासाठी वापरलेल्या त्या वाक्यावरुन त्यांची विनोद बुद्धीही कमाल असल्याची मला खात्री पटली.

तीन दिवसांत मी या माणसासमोर भक्त होऊन बसलो, त्यांना ऐकलं. सतत असं काहीतरी सांगायचे की, मोत्यांचा पाऊस पडला तर कोणता मोती वेचावा या गोंधळातच वेळ जावा तसं माझं झालं. तिसऱ्या दिवशी मी कागद पेन घेऊन बसलो आणि चक्क ते बोलतात ते लिहित गेलो. निघताना त्यांना म्हणालो, सुदर्शन सर मला तुम्ही खूप आवडलात. मला आशीर्वाद द्या. त्यांनी समर्थ रामदासांचा दासबोध दिला. त्यांचा निरोप घेताना का कोण जाणे मला खूप रडू येत होतं. मी निघतांना त्यांना घट्ट मिठी मारली, मला त्यांना अजिबात सोडवत नव्हतं.
त्यांनी पाठीवरुन त्यांचा हात छान फिरवून गाडीत बसण्यापूर्वी एक हात वर करुन एकदम स्टाईलीश बाय केला आणि त्यांच्या शर्टच्या पांढऱ्या रंगाला मॅच होणाऱ्या पांढऱ्याशुभ्र महागड्या गाडीत निघून गेले. आपण नुसते मराठी, महाराष्ट्र, धर्म असा गवगवा करतो पण सातासमुद्रापार ४५ वर्षं राहूनही मनांत, वागण्यांत, कर्तृत्वात, मराठी भाषा, महाराष्ट्र आणि भारत घेऊन फिरणारं सुदर्शन चक्र मला अनेक अर्थांनी चक्रावून गेलं.
धन्यवाद.

Tags: fan momentmarathi actorsankarshan karhade
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Mannara Chopra Father Last Rites

Video : वडिलांचं पार्थिव पाहताच ढसाढसा रडू लागली मन्नारा चोप्रा, मन हेलावून टाकणारा व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.