Mannara Chopra Father Last Rites : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राची चुलत बहीण आणि अभिनेत्री मन्नारा चोप्राचे वडील रमण राय हांडा यांचे १६ जून रोजी निधन झाले. बुधवारी, १८ जून रोजी मुंबईच्या ओशिवरा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दरम्यान, मन्नारा आणि तिची बहीण ढसाढसा रडताना दिसली. वडिलांच्या जाण्याचे दुःख दोन्ही बहिणींना झालं आणि त्या भावुक झाल्या. वडिलांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी त्या या अंत्यसंस्कारावेळी हजर होत्या. शिवाय मन्नाराचे कुटुंबीय ही त्यांच्या या दुःखाच्या वेळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते.
मन्नारा चोप्राच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला मुसळधार पाऊस पडत होता आणि भरपावसात त्यांचे पार्थिव नेत असताना मन्नाराही त्यांच्याबरोबर चालत होती आणि अधूनमधून वडिलांना हात लावताना दिसली. वडिलांना अंतिम निरोप देताना मन्नारा आणि तिची बहीण मिताली रडताना दिसले आहेत. बरेच नातेवाईक आणि मन्नाराच्या वडिलांच्या जवळच्यांनी अंतिम निरोपावेळी हजेरी लावली. अभिनेत्री परिणीती चोप्राचे वडील पवन चोप्राही यावेळी उपस्थित होते.
मन्नाराच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाले आहेत, ज्यात मन्नारा चोप्रा आणि तिच्या कुटुंबावर ओढवलेली स्थिती पाहून चाहतेही भावुक झाले. एका व्हिडीओमध्ये मन्नारा आई आणि बहिणीसमवेत उभे होती. यावेळी रडून रडून ती बेशुद्धही झाली आणि आणि स्वतःला तोल सोडून ती खाली पडणार इतक्यात उर्वरित लोकांनी तिला सांभाळले आणि तिला आधार दिला.
हे ज्ञात आहे की मन्नाराचे वडील रमण राय हांडा हे दिल्ली उच्च न्यायालयात वकील होते. ते बराच काळ आजारी होते आणि मुंबईत त्यांच्यावर उपचारही सुरु होते. रमण राय यांचे कुटुंब आता त्यांच्या जाण्याने दुःखात आहे, त्याशिवाय त्यांची पत्नी कामिनी चोप्रा, मुली-मन्नारा आणि मिताली यांनाही भावना अनावर होत आहेत. मन्नारा चोप्राला आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी मिळताच ती त्वरित मुंबईत पोहोचली. मुंबई विमानतळावर ती अस्वस्थ दिसली. मन्नाराने पुन्हा इन्स्टाग्रामवरील एका पोस्टद्वारे वडिलांच्या मृत्यूची माहिती दिली, ज्यावर चाहत्यांनी कमेंट करत अभिनेत्रीला धैर्य दिले. प्रियांका चोप्रा आणि तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा यांनीही मन्नाराचे वडील आणि काका रमण राय यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला.





