सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दीड वर्षांनी केस वाढले आणि…; कॅन्सरवरील उपचाराच्या वेदना असूनही हिना खानच्या चेहऱ्यावर आनंद, सगळ्यांचेच डोळे पाणावले

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 18, 2025 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hina Khan Hair Grow

दीड वर्षांनी केस वाढले आणि…; कॅन्सरवरील उपचाराच्या वेदना असूनही हिना खानच्या चेहऱ्यावर आनंद, सगळ्यांचेच डोळे पाणावले

Hina Khan Hair Grow : टीव्ही अभिनेत्री हिना खानने अलीकडेच तिच्या बऱ्याच वर्षांपासून रिलेशनमध्ये असलेला तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालशी लग्न केले आहे. अभिनेत्री आयुष्यातील प्रत्येक आनंदी क्षणाचा आनंद घेत आहे. ती लवकरच ‘पति पत्नी और पंगा’मध्ये दिसणार आहे. परंतु यापूर्वी, ब्रेस्ट कॅन्सर फाइटर हिनाने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यातून चाहते देखील आनंदी झाले आहेत. सुमारे दीड वर्षानंतर, अभिनेत्रीचे केस इतके वाढले आहेत की दोन लहान बो तिने बांधले आहेत. हिना खान अनेक वर्षांपासून ब्रेस्ट कॅन्सरचा सामना करत आहे. कॅन्सरदरम्यानच्या उपचाराबाबत तिने वेळोवेळी सोशल मीडियाद्वारे अपडेटही चाहत्यांसह शेअर केली आहे.

हिना खानने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. यामध्ये तिने लिहिले आहे की, “दीड वर्षानंतर, मी माझ्या केसांना वर बांधले आहे. तुम्हाला सांगू शकत नाही. होय, मला केसांचे क्लिप आठवले. मी वाट पाहत आहे. एका वेळी एकेदिवशी…हा छोटासा आनंद”. हिनाने सोशल मीडियाद्वारे उघड केले होते की, ती स्तनाच्या कर्करोगाच्या तिसर्‍या टप्प्यात झगडत आहे. त्यावर केमोथेरपीचे उपचार सुरु होते. या दरम्यान, तिने आपल्या चाहत्यांना प्रत्येक क्षणाबद्दल माहिती दिली. जेव्हा तिचे केस पडू लागले, तेव्हा तिने स्वत: चे टक्कल केले आणि स्वत: चे केस विग म्हणून वापरले. जे अनेकदा अनेक प्रसंगी परिधान करताना ती दिसली.

आणखी वाचा – “महाराष्ट्रात मराठीच…”, हिंदी भाषा सक्तीवर हेमंत ढोमे भडकला, म्हणाला, “मेंदूला किती ताण देणार? आणि…”

View this post on Instagram

A post shared by 𝑯𝒊𝒏𝒂 𝑲𝒉𝒂𝒏 (@realhinakhan)

आता हिनाचे आयुष्य पुन्हा रुळावर परत येत आहे. नुकतीच तिने रॉकी जयस्वालशी गुप्तपणे लग्न झाले. दोघेही बर्‍याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ‘ये रिश्ता क्या केहलता है’ या मालिकेत हिना अक्षराची भूमिका साकारत असताना तिची आणि रॉकीची भेट झाली आणि रॉकी शोमध्ये सुपरवायझिंग निर्माता म्हणून काम पाहत होता.

आणखी वाचा – “कॅन्सर सर्जरीदरम्यान रुहानला स्तनपान करण्यापासून रोखणं होतं कठीण”, दीपिका कक्करचा खुलासा, म्हणाली, “अनेक रात्री…”

हिना खान आणि रॉकी जयस्वाल यांनी ११ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले आहे. अचानक समोर आलेल्या त्यांच्या लग्नाच्या फोटोंनी सुखद धक्का बसला. हिना ३७ वर्षांची असून काश्मिरी मुस्लिम आहे. आणि रॉकी जायसवाल हिंदू परिवार कुटुंबातील आहे. परंतु दोघेही नेहमीच एकमेकांच्या सणांमध्ये सहभाग घेतात. हिनाचे लग्न सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालसारखे झाले आहे. तिने खासगी पद्धतीने रॉकीबरोबर नोंदणी पद्धतीने विवाह उरकला आहे

Tags: cancer treatmenthair growhina khan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Sankarshan Karhade Fan Moment

"सातासमुद्रापार ४५ वर्षं राहूनही…", परदेशात मराठी गृहस्थाला भेटून संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणाला, "निघतांना घट्ट मिठी मारली…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.