रविवार, जून 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॅकस्टेजला काम करणाऱ्या मुलाने केलं लग्न, संकर्षण कऱ्हाडेला बायकोसह भेटायला आला अन्…; अभिनेता म्हणाला, “नाटकाच्या जीवावर संसार…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 2, 2024 | 6:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sankarshan Karhade shared special post for his play’s backstage artist

बॅकस्टेजला काम करणाऱ्या मुलाने केलं लग्न, संकर्षण कऱ्हाडेला बायकोसह भेटायला आला अन्...; अभिनेता म्हणाला, "नाटकाच्या जीवावर संसार..."

मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा मनोरंजनाच्या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे, संकर्षण हा त्याच्या अभिनयाव्यतिरिक्त अनेक कारणांनी चर्चेत असतो. संकर्षणचे रंगभूमीवर सध्या ‘तू म्हणशील तसं’, ‘नियम व अटी लागू’ आणि ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ ही तीन नाटकं सुरु आहेत. तो एक उत्तम लेखक, कवी व संवादकार असल्यामुळे त्याचे लिखाण व बोलणं ऐकणे हेदेखील त्याच्या चाहत्यांना भलतेच आवडत असते. संकर्षण हा त्याच्या अभिनयामुळे जितका चर्चेत असतो, तितकाच तो त्याच्या सोशल मीडियाद्वारेदेखील चर्चेत राहत असतो.

अशातच त्याने सोशल मीडियावर नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे आणि या पोस्टद्वारे त्याने नाटकात बॅकस्टेजचे काम करणाऱ्याविषयी त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. संकर्षणने त्याच्याबरोबर खास फोटो पोस्ट करत असं म्हटलं आहे की, “आज आमच्या ‘तू म्हणशील तसं’ आणि ‘नियम व अटी लागू’ या नाटकांमध्ये बॅकस्टेजचं काम करणारा अक्षय पवार त्याचा नवा संसार सुरु करून भेटायला आला. बायकोची ओळख करुन दिली आणि त्याच्या बायकोला म्हणाला “सोनाली, दादाला नमस्कार कर” आणि इतकं गोड वाटलं. नाटक हे तसं अनिश्चीततेचं माध्यम आहे. पण नेटाने, चिकाटिने , सातत्याने नाटक केलं तर नाटक खूप काही देतं”

View this post on Instagram

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

आणखी वाचा – बायको गरोदर असतानाच बाहेर अफेअर, सत्य समजलं अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी म्हणालेली, “मला सगळं माहित असतानाही…”

यापुढे त्याने असं म्हटलं की, “आज बॅकस्टेज करणाऱ्या ह्या मुलाने आयुष्यातलं मोठं पाऊल नाटकाच्या जीवावर ऊचललं. संसार सुरू केला. म्हणून प्रत्येक प्रयोग महत्वाचा असतो, कारण त्या प्रत्येक प्रयोगावर  एका कुटुंबाच्या घरी संसार सुरू असतो. असे अनेक संसार सुखी करण्यासाठी नाटक फार फार महत्वाचं आहे.” या फोटोला संकर्षणने नाटकातला संसार असं कॅप्शन देत दोघांना त्यांच्या नवीन लग्नानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – “गरोदर असतानाच शोमधून मला काढलं अन्…”, सुप्रसिद्ध अभिनेत्री-होस्टबरोबर नावाजलेल्या शोच्या निर्मात्यांचं धक्कादायक वर्तन, म्हणाली, “टीव्हीवर पाहणं…”

दरम्यान, संकर्षणचे रंगभूमीवर सध्या ‘नियम अटी लागू’, ‘तू म्हणशील तसं’ या नाटकांसह त्याचा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कवितांचा कार्यक्रमही सुरू आहे. तसेच त्याच्या नाटकांना व कवितांच्या कार्यक्रमांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसादही मिळत आहे.     

Tags: marathi actormarathi entertainment newssankarshan karhade
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
pushkar jog on hardik pandya

"रोहितचे चाहते असणं ठिक पण…", हार्दिक पांड्याला सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा पाठिंबा, म्हणाला, "अशी वागणूक मिळणं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.