सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“गरोदर असतानाच शोमधून मला काढलं अन्…”, सुप्रसिद्ध अभिनेत्री-होस्टबरोबर नावाजलेल्या शोच्या निर्मात्यांचं धक्कादायक वर्तन, म्हणाली, “टीव्हीवर पाहणं…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 2, 2024 | 4:13 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mini Mathur was kicked out of a reality show when she was pregnant

"गरोदर असतानाच शोमधून मला काढलं अन्...", सुप्रसिद्ध अभिनेत्री-होस्टबरोबर नावाजलेल्या शोच्या निर्मात्यांचं धक्कादायक वर्तन, म्हणाली, "टीव्हीवर पाहणं..."

छोट्या पडद्यावरील मालिकांशिवाय अनेक रिअ‍ॅलिटी शोला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळते. रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्पर्धकांसह सूत्रसंचालन करणाऱ्या कलाकारांनाही यातून प्रसिद्धी मिळते. अशीच एक लोकप्रिय टीव्ही सूत्रसंचालक म्हणजे मिनी माथुर. अनेक चाहते मिनी माथूरचा चेहरा कधीही विसरू शकत नाहीत. मिनीने टीव्हीवर अनेक मोठे रिॲलिटी शोजचे सूत्रसंचालन केले आहे. ‘इंडियन आयडॉल’ या प्रसिद्ध रिॲलिटी शोच्या पहिल्या सीझनमध्ये दिसलेल्या मिनीने या शोच्या ६ सीझन्सचे सूत्रसंचालन केले. त्यामुळे तिची लोकप्रियता आजही कायम आहे.

२८ वर्षांचा सूत्रसंचालनाचा अनुभव असलेल्या मिनीने “आजकाल सूत्रसंचालनासाठी कोणत्याही कौशल्याची गरज नाही” असं म्हणत तिला निर्मात्याने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दलही सांगितले आहे. त्याचबरोबर मिनीने आजकाल चालणाऱ्या रिॲलिटी शोच्या सूत्रसंचालनाच्या कौशल्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘हिंदुस्तान टाईम्स’शी संवाद साधताना तिने असं म्हटलं होतं की, “मी गरोदर असताना मला एका अशा कारणांमुळे शोमधून काढण्यात आले, जे ऐकून मला खूप वाईट वाटलं”.

View this post on Instagram

A post shared by Mini Mathur (@minimathur)

गरोदरपणामुळे शोमधून काढून टाकण्यात आल्याबद्दलही मिनीने धक्कादायक खुलासा केला होता. यावेळी तिने असं म्हटलं होतं की, “मी गरोदर असताना एका मोठ्या शोच्या निर्मात्याने मला सांगितले की, भारतीय प्रेक्षकांना गर्भवती महिलांना टीव्हीवर पाहणे कधीही आवडत नाही. जे ऐकून मला खूपच वाईट वाटले आणि केवळ मी गरोदर असल्यामुळे मला या शोमधून काढून टाकण्यात आले होते”.

आणखी वाचा – मराठीत पहिल्यांदाच AI महाबालनाट्य येणार, हे नाटक नेमकं कसं असणार?, मराठी कलाकारांकडून नव्या प्रयोगाचं तोंडभरुन कौतुक, प्रेक्षक काय म्हणाले?

मिनीने ‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या ३ सीझनचे सूत्रसंचालन केले होते आणि प्रेक्षकांनाही ती सूत्रसंचालक म्हणून आवडली होती. पण गरोदरपणामुळे तिला या शोमधून ब्रेक घ्यावा लागला. मग आई झाल्यानंतर मिनी पुन्हा सूत्रसंचालक म्हणून परतली आणि संगीतासंबंधित तिने अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले.

आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडच्या वडिलांचा संगीतक्षेत्रातील मानाच्या पुरस्काराने सन्मान, लेकीचा आनंद गगनात मावेना, म्हणाली, “श्री संत एकनाथ महाराजांचा आशीर्वाद…”

दरम्यान, यावेळी मिनीने पूर्वीच्या आणि आताच्या रिॲलिटी शोचीही तुलना केली. याबद्दल तिने असं म्हटलं की, “आता एखाद्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी तुम्हाला कोणत्याही कौशल्याची गरज नाही. जे टीव्हीवर लोकप्रिय आहेत आणि ज्यांचे सोशल मीडियावर भरपूर फॉलोअर्स आहेत. त्यांना टेलीप्रॉम्प्टरमध्ये शब्द टाका आणि मग सूत्रसंचालक तयार होतो” 

Tags: entertainment newsHindi Reality Show HostMini Mathur
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Bigg Boss Marathi 6 Winner
Entertainment

‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ची विजेती ठरली तन्वी कोलते, ट्रॉफीसह मिळवली इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव

एप्रिल 20, 2026 | 10:15 am
Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Next Post
Mohena Kumari Blessed With Baby Girl

मोहिना कुमारी दुसऱ्यांदा झाली आई, गोंडस मुलीला दिला जन्म, कुटुंबातील मंडळींकडून जोरदार स्वागत, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.