शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बैल आजारी कळताच वडील परभणीत तडकाफडकी निघाले अन्…; संकर्षण कऱ्हाडेने सांगितला प्रसंग, म्हणाला, “देवाचा धावा करुन…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 12, 2025 | 1:22 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sankarshan Karhade Shared Special Post

बैल आजारी कळताच वडील परभणीत तडकाफडकी निघाले अन्…; संकर्षण कऱ्हाडेने सांगितला प्रसंग, म्हणाला, "देवाचा धावा करुन…"

Sankarshan Karhade Shared Special Post : मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आजवर संकर्षणने त्याच्या अभिनयाच्या जोरावर नाटक, मालिका यांमधून रसिक प्रेक्षकांची मन जिंकली. अभिनयाशिवाय कवी, लेखक या जबाबारदाऱ्याही संकर्षण उत्तमरीत्या सांभाळतो. सध्या संकर्षण रंगमंचावर धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावरही संकर्षणचा बऱ्यापैकी वावर असलेला पाहायला मिळतो. नेहमीच तो सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. याद्वारे तो त्याचे अनेक वैयक्तिक अनुभव, कामादरम्यान आलेले अनुभव, नाटक दौऱ्याच्या आठवणी, कुटुंबाबाबतचे अनुभव शेअर करतो. अशाप्रकारे संकर्षण सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो.

अशातच संकर्षणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. संकर्षणने केलेली ही पोस्ट त्याच्या वडिलांसाठीची आहे. बाबांसाठी खास पोस्ट शेअर करत संकर्षणने असं म्हटलं आहे की, “आमचे बाबा परवा मुंबईहून तडकाफडकी परभणीला निघाले कारण काय तर शेतातल्या गड्याचा फोन आला की, आपल्या शेतातला बैल रामा गेले दोन दिवस झाले जागचा उठत नाहीये, काहीच खात नाही आहे. मी म्हणालो, बाबा गडी आहे मग तुम्ही जायची काय गरज?’. मला म्हणाले, ‘उद्या तुला बरं वाटलं नाही तर असाच परभणीहून पळत येईन ना’. मी म्हणालो, ‘मी काय बैलासारखाच का?’. बाबा म्हणाले, ‘नाही पण बैल पोरासारखा सांभाळावा’. निघाले ते निेघालेच”.

आणखी वाचा – खुशखबर! CID मध्ये पुन्हा एसीपी प्रद्युमन यांची धमाकेदार एंट्री, प्रेक्षकांच्या नाराजीमुळे मोठा निर्णय, नक्की काय घडलेलं?

View this post on Instagram

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

पुढे त्याने लिहिलं आहे की, “दोन दिवस त्याच्याबरोबर वेळ घालवला, त्याला खूप माया केली , त्याला स्वतःच्या हाताने खाऊ घातलं. देवाचा धावा करुन त्याला तीर्थ म्हणून पाणी पाजलं आणि आता रामा कामाला लागला. याला तुम्ही काय म्हणाल?, म्हणा काही पण, सगळ्या आघाड्यांवर सतत कसं १०० टक्के खरं उतरायचं हे बाप माणसांना बरोबर कळतं”. ही पोस्ट शेअर करत संकर्षणने त्याच्या बाबांचा शेतातील व्हिडीओ पोस्ट केला आहे. यांत ते रामा या बैलाची विशेष काळजी घेताना दिसत आहेत.

आणखी वाचा – ‘छबी’ चित्रपटाचा थरारक टीझर समोर, कथेला हॉरर टच, दमदार कलाकारांसह मराठीमध्ये नवा प्रयोग

हा व्हिडीओ व कॅप्शन पाहून अनेकांनी या व्हिडीओला पसंती दर्शविली आहे. अनेकांच्या मनाला हा व्हिडीओ भावला असल्याचं कमेंटमध्ये कळतंय. या व्हिडीओखाली अमृता खानविलकर, संग्राम समेळ, तेजश्री प्रधान, मुग्धा वैशंपायन या कलाकारांनीही कमेंट करत कौतुक केलं आहे.

Tags: marathi actorsankarshan karhadeSankarshan Karhade Shared Special Post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
Next Post
PSI Arjun Poster

"थांब म्हटलं की थांबायचं…", 'पी.एस.आय.अर्जुन'चा टिझर प्रदर्शित, अंकुश चौधरीच्या लूकची सोशल मीडियावर हवा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.