शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“थांब म्हटलं की थांबायचं…”, ‘पी.एस.आय.अर्जुन’चा टिझर प्रदर्शित, अंकुश चौधरीच्या लूकची सोशल मीडियावर हवा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 12, 2025 | 3:49 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
PSI Arjun Poster

"थांब म्हटलं की थांबायचं…", 'पी.एस.आय.अर्जुन'चा टिझर प्रदर्शित, अंकुश चौधरीच्या लूकची सोशल मीडियावर हवा

PSI Arjun Poster : सध्या एका पोस्टरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. आणि ही चर्चा दुसरी तिसरी कोणाची नसून महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरीच्या पोस्टरची आहे. ‘पी. एस. आय.अर्जुन’च्या भूमिकेत अंकुश मोठया पडद्यावर राडा घालायला येतोय. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर करत ‘अर्जुन माझ्या नावात… वर्दी माझी जोमात… गुन्हेगार कोमात…!’ असे जबरदस्त कॅप्शन देण्यात आले आहे. अंकुशचा पोलिसांच्या वर्दीतील हा डॅशिंग लूक कमाल दिसत असून ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटानंतर दोन वर्षांनी अंकुश प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.

नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून ९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘पी.एस.आय.अर्जुन’ या चित्रपटात अंकुश पहिल्यांदाच रुबाबदार पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. अंकुशला अशा नव्या रुपात बघून त्याचे चाहतेही भलतेच सुखावले आहेत. इतकेच नाही बॉलिवूडमधील आपला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख यालाही अंकुशच्या या नव्या लूकने भुरळ घातली आहे.

आणखी वाचा – ‘छबी’ चित्रपटाचा थरारक टीझर समोर, कथेला हॉरर टच, दमदार कलाकारांसह मराठीमध्ये नवा प्रयोग

View this post on Instagram

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

अंकुशची आकर्षक पर्सनॅलिटी आणि फॅशन सेन्समुळे तो तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहेच. स्टाईल आयकॉन असलेल्या अंकुशला ‘ट्रेंड सेटर’ म्हणायलाही काहीच हरकत नाही. बऱ्याच चित्रपटातील त्याचे डायलॉग्स प्रचंड गाजले आहेत. आताही ‘पी.एस.आय.अर्जुन’ मधील असाच एक डायलॉग सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे, तो म्हणजे ‘थांब म्हटलं की थांबायचं…’ या दमदार डायलॉगने सध्या अनेकांना वेड लावलं आहे. तरुणाई यावर रील्स बनवत आहेत. त्यामुळे अंकुश एका अनोख्या अंदाजात यात झळकणार असल्याचं दिसतंय.

आणखी वाचा – बैल आजारी कळताच वडील परभणीत तडकाफडकी निघाले अन्…; संकर्षण कऱ्हाडेने सांगितला प्रसंग, म्हणाला, “देवाचा धावा करुन…”

‘व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा’, ‘ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट’ निर्मित ‘पी.एस.आय.अर्जुन’चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत. येत्या ९ मे रोजी ‘पी. एस. आय. अर्जुन’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: marathi moviePSI Arjun PosterPSI Arjun teaser
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
upi down in india

देशभरात UPI सेवा ठप्प, ग्राहकांकडून हजारो तक्रारी, अशाप्रकारे करा ऑनलाइन पेमेंट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.