प्रत्येक कलाकाराचा असा अभिनयक्षेत्रात स्वतःचा असा प्रवास सुरूच असतो. बरीच कलाकार मंडळी अशी आहेत जी त्यांचा अभिनयक्षेत्राचा वारसा पुढे नेत असतात. तर काही कलाकार मंडळी असे असतात जे अभिनय कौशल्याची आवड जोपासत काम करतात. तर बरीच कलाकार मंडळी अशीही असतात जी अपघाताने सिनेसृष्टीत येतात. पण कलाकार हा कलाकारचं असतो. त्यामुळे एक कलाकार म्हणून तो त्याची अभिनयाची शैली वेळोवेळी जोपासताना दिसतो. (Akshay Mudawadkar Work Profile)
अशातच एका मराठमोळ्या कलाकाराने त्याची अभिनय क्षेत्रातील आवड जोपासण्यासाठी त्याने शिक्षण घेतलेल्या, तो काम करत असलेल्या क्षेत्राला रामराम केला. तर हा अभिनेता आहे अक्षय मुडावदकर. ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत अभिनेता अक्षय मुडावदकर स्वामींच्या मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेमुळेच अक्षयला खऱ्या अर्थाने लोकप्रिय मिळाली. याशिवाय अक्षय नाटकविश्वातही बऱ्यापैकी सक्रिय आहे. ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजत असून या नाटकांतूनही अक्षयचा अभिनय पाहणं रंजक ठरतंय.
आणखी वाचा – सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकरने खरेदी केली आलिशान कार, म्हणाला, “बायको मला तुझा…”
मात्र अभिनयक्षेत्रात येण्याआधी अक्षय वेगळ्याच क्षेत्रात सक्रिय होता. अक्षयने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला असून तो एका हॉटेलमध्ये सुरुवातीला नोकरी करत होता. त्यानंतर एका कंपनीतही त्याने आठ वर्षे नोकरी केली होती. अभिनयाक्षेत्रात येण्याआधीचा त्याच्या प्रवासाबाबत अक्षयने ‘इट्स मज्जा’च्या ‘पाडवा स्पेशल’ या मुलाखतीमध्ये सांगितलं. यावेळी बोलताना अक्षय म्हणाला, “हॉटेल मॅनेजमेंट मध्ये माझं शिक्षण पूर्ण झालं आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ मी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये नोकरी केली. त्यानंतर मी माझं मास्टर्सचं शिक्षण एचआर या क्षेत्रात पूर्ण केलं. हे सर्व झाल्यावर साधारण आठ वर्षे मी एका कंपनीत अॅडमिन या डिपार्टमेंटला नोकरी केली. तिथे काम करता करता मी नाटकांमधूम काम करत होतो”.
यापुढे बोलताना अक्षय म्हणाला, “राज्यनाट्य असेल वा कामगार कल्याण यांमध्ये मी सक्रिय होतो. अॅडमिन क्षेत्रात काम करत होतो त्याचवेळी आमचं लग्न झालं होतं. तेव्हा नेहासुद्धा नोकरी करत होती. काही काळ गेल्यानंतर अभिनयाची आवड म्हणा वा अभिनय क्षेत्र मला स्वस्थ बसू देत नव्हतं. आमच्या लग्नाला सात वर्षे झाली आणि मी नेहाला म्हणालो आता मला पुर्णपणे अभिनयक्षेत्रात काम करायचं आहे. आणि त्यानंतर माझा अभिनयक्षेत्रातला प्रवास सुरू झाला”.