सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मध्यरात्री २.३० वाजता…”, दीड महिन्यानंतर अमेरिकेहून मुंबईमध्ये आला संकर्षण कऱ्हाडे, म्हणाला, “भारतात आल्यानंतर…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 11, 2023 | 11:42 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sankarshan Kaharade returned to Mumbai

दीड महिन्यानंतर अमेरिकेहून मुंबईमध्ये आला संकर्षण कऱ्हाडे

मराठी मनोरंजनविश्वातील एक गुणी अभिनेता म्हणून अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याला ओळखलं जातं. एका रिॲलिटी शोमधून पुढे आलेला संकर्षण नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारली आहे. तो केवळ उत्तम अभिनेताच नाही, तर एक उत्तम लेखक, दिग्दर्शक व कवी म्हणूनही ओळखला जातो. तो नेहमीच वेगवेगळ्या माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. काही दिवसांपूर्वी संकर्षणच्या ‘नियम व अटी लागू’ नाटकाचे प्रयोग अमेरिकेत यशस्वीरीत्या पार पडले. या यशस्वी दौऱ्यानंतर तो दीड महिन्यांनी मायदेशी परतला आहे. (Sankarshan Kaharade returned to Mumbai)

गेल्या दीड महिन्यांपासून संकर्षण व ‘नियम व अटी लागू’ नाटकाची संपूर्ण टीम अमेरिकेच्या दौऱ्यावर होती. त्यांच्या नाटकांच्या सर्व प्रयोगाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आता अमेरिकेतील प्रयोग पार पडल्यानंतर संपूर्ण टीमसह संकर्षण नुकताच मुंबईत परतला. खाद्यप्रेमी असलेल्या संकर्षणने दीड महिन्यांनंतर मुंबईत पोहोचताच वडापावचा आस्वाद घेतला. त्याबाबतची एक पोस्ट नुकतंच त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याच्या हातातील डिशमध्ये वडापाव दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत त्याने त्याच्या चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे.

हे देखील वाचा – आधी ‘माकडचाळे’ म्हणून हिणवलं, आता अविनाश नारकरांनी ‘तो’ व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटकरी करताहेत कौतुक, बायकोनेही केली कमेंट

संकर्षण या पोस्टमध्ये म्हणतो, “सुप्रभात, काल मध्यरात्री २.३० वाजता मी भारतात पोहोचलो. मुंबईत पोहोचताच मला प्रचंड भूक लागली हो. तेव्हा मी काय खाल्लं बघा… खूप गॅपनंतर जर तुम्ही भारतात आलात तर काय खाल? तुम्हाला काय आवडेल?”, असं प्रश्न त्याने त्याच्या चाहत्यांना विचारला आहे. शिवाय, त्याने राज्यभरात होणाऱ्या आगामी नाटकांच्या प्रयोगांची माहिती दिली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहते लाईक्स व कमेंटसचा वर्षाव करत आहे.

हे देखील वाचा – Amitabh Bachchan Birthday : ८१व्या वाढदिवसानिमित्त अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी चाहत्यांची ‘जलसा’ बंगल्याबाहेर मोठी गर्दी, व्हिडिओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

अमेरिकेतील यशस्वी दौऱ्यानंतर तो पुन्हा ‘नियम व अटी लागू’ नाटक घेऊन राज्यातील रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. शिवाय या नाटकांव्यतिरिक्त ‘तू म्हणशील तसं’ आणि ‘संकर्षण Via स्पृहा’ ही दोन नाटकसुद्धा सुरु असून या सर्व नाटकांचे प्रयोग ठाणे, पुणे, मुंबई व अन्य ठिकाणी पार पडणार आहे.

Tags: marathi actormarathi natakniyam va ati laguSankarshan Kaharade returned to Mumbaisankarshan karhade
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
amitabh bachchan birthday

मराठी मुलीबरोबर तीन वर्ष अफेअर, लग्नही होणार होतं पण...; अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ नात्याबाबत मित्रानेच केला होता मोठा खुलासा  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.