मंगळवार, ऑगस्ट 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठी मुलीबरोबर तीन वर्ष अफेअर, लग्नही होणार होतं पण…; अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ नात्याबाबत मित्रानेच केला होता मोठा खुलासा  

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 11, 2023 | 11:50 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
amitabh bachchan birthday

amitabh bachchan birthday

Happy Birthday Amitabh Bachchan : बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज ८१वा वाढदिवस आहे. अमिताभ यांच्या जलसा बंगल्याबाहेर तर चाहत्यांनी त्यांना भेटण्यासाठी तुफान गर्दी केली होती. त्यांनीही बंगल्याबाहेर येत चाहत्यांना भेट दिली. दरम्यान चाहत्यांनी केलेल्या तुफान गर्दीचे फोटो व व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कलाकार मंडळीही आज अमिताभ यांच्या वाढदिवसानिमित्त व्यक्त होताना दिसत आहेत. आजवर त्यांनी कलाक्षेत्राला दिलेलं योगदान अमुल्य आहे. इतकंच नव्हे तर अजूनही त्यांचे पाच चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. कामाबरोबरच अमिताभ यांचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं. त्याचविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. (Amitabh Bachchan Love Life)

अमिताभ यांच्या लव्ह लाइफविषयी बऱ्याचदा बोललं जातं. त्यादरम्यान अभिनेत्री रेखा यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. रेखा अमिताभ यांचं पहिलं प्रेम आहे हे जगजाहिरच आहे. पण त्यांचं पहिलं प्रेम रेखा नसून एक दुसरीच व्यक्ती होती. रेखा व जया यांच्याआधी अमिताभ यांच्या आयुष्यामध्ये एक मुलगी होती. ‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार महाराष्ट्रीयन मुलगी अमिताभ यांचं पहिलं प्रेम होती. अमिताभ यांच्या जवळच्या मित्राने याबाबत खुलासा केला होता.

आणखी वाचा – ‘कश्मीर फाईल्स’च्या निर्मात्यांना आशा पारेख यांचा थेट सवाल, म्हणाल्या, “४०० कोटी कमावले पण काश्मिरी पंडितांना तुम्ही…”

अमिताभ यांचे मित्र दिनेश कुमार यांनी म्हटलं होतं की, एका नाटकादरम्यान अमिताभ व त्या मुलीची मैत्री झाली. जवळपास तीन वर्ष दोघं रिलेशनशिपमध्ये होते. बॉलिवूडमध्ये अमिताभ यांचं फारसं नाव नव्हतं त्यादरम्यानची ही गोष्ट आहे. त्या दिवसांमध्ये ते कोलकातामध्ये नोकरी करत होते. त्याच कंपनीमध्ये काम करणाऱ्या मराठी मुलीच्या ते प्रेमात पडले. त्या मुलीचं नाव चंदा होतं. दोघांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला.

आणखी वाचा – Rekha Birthday : वडिलांचं निधन झालं तरीही रडल्या नाहीत रेखा, स्वतःच खुलासा करत म्हणालेल्या, “त्यांचं आणि माझं नातं…”

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अमिताभ यांनी कोलकातामधील नोकरी सोडली आणि ते मुंबईला निघून आले. त्या मुलीने नंतर सुप्रसिद्ध बंगाली अभिनेत्याबरोबर लग्न केलं. १९७०मध्ये जया व अमिताभ यांची भेट झाली. त्यावेळी जया सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या. अमिताभ मात्र अभिनय क्षेत्रामध्ये नाव कमावण्यासाठी धडपड करत होते. एका मासिकाच्या कव्हर पेजवर अमिताभ यांनी जया यांना पाहिलं. त्यानंतर ते जया यांच्या प्रेमात पडले. अमिताभ त्यांचं पहिलं प्रेम विसरत जया यांच्या अगदी जवळ आले. अखेरीस दोघंही विवाहबंधनात अडकले.

Tags: amitabh bachchanbollywood actorbollywood news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

paach futacha bachchan
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ कोण?, रंगभूमी गाजवल्यानंतर श्रुती मधुदीपची सिनेमात दमदार एन्ट्री

ऑगस्ट 24, 2026 | 4:48 pm
 Tejaswini Lonari & Samadhan Sarvankar Baby Boy
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, केलं चिमुकल्या बाळाचे स्वागत, कौतुकाचा वर्षाव

ऑगस्ट 22, 2026 | 4:21 pm
Lagnantar Hoyilch Prem Promo
Entertainment

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत मोठा ट्विस्ट! कॉलेजमध्येच नंदिनीने केली काव्याची डिलिव्हरी, प्रोमो पाहून प्रेक्षक थक्क

ऑगस्ट 20, 2026 | 5:54 pm
Monsoon Kitchen Tips
Lifestyle

पावसाळ्यात मीठ वारंवार ओलसर होतंय? ‘या’ किचन टिप्स वापरून व्हा समस्येपासून मुक्त

ऑगस्ट 19, 2026 | 11:19 am
Next Post
Hemangi Kavi Ad Shoot with Amitabh Bachchan

हेमांगी कवीला लॉट्री, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करताना दिसणार, फोटो शेअर करत म्हणाली, "काय सांगू तुम्हाला जिथे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.