सध्या भाग्य दिले तू मला ही मालिका वेगळ्या वळणावर आहे.वैदही आणि सानिया या जोडीने मोहिते कुटुंबाच्या नाकीनऊ आणले आहेत. परंतु आता त्यांची खेळी त्यांच्या वरच उलटताना आपल्याला पाहायला मिळते आहे.सानिया आणि वैदही समोर मोहिते कुटुंबांनी हार मानली नाही आहे. याउलट मोहिते कुटुंब त्यांची एक एक खेळी उधळून लावायचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. (Jahnavi Killekar And Purva Phadake)
तर याच सानिया आणि वैदही म्हणजे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि अभिनेत्री पूर्वा फडके.यांची ही जोडी पडद्यामागे देखील आपल्याला एकत्र पहायला मिळते. कलाकारांचं हे पडद्यामागचं बॉण्डिंग खास असतं. जान्हवी आणि पूर्वा त्यांच्या सोशल मीडियावर देखील सक्रिय असतात. भाग्य दिले तू मला या मालिके पूर्वी जान्हवी आई माझी काळूबाई, स्वामी समर्थ या मालिकांमध्ये झळकली होती, तर पूर्वा अजूनही बरसात आहे या मालिकेत पहायला मिळाली होती.
पहा सानिया आणि वैदेहीचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग (Jahnavi Killekar And Purva Phadake)
तर जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून तिची आणि पूर्वाची एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात त्या दोघीनी डेनिम घालून मॅचिंग केलेलं पहायला मिळतंय.तसेच त्यांनी या फोटोज मध्ये अगदी मजेशीर पोज देखील दिल्या आहेत.जान्हवीने ट्विनिंग असे कॅप्शन देत ही स्टोरी शेअर केली आहे.त्यांच्या या ट्विनिंग लुक मध्ये दोघीही फार क्युट दिसत आहेत.(Jahnavi Killekar And Purva Phadake)

जान्हवीच्या सध्या फिटनेस व्हिडिओ देखील फार चर्चेत आहेत. ती तिचे वर्कआऊट व्हिडिओ सोशल मीडिया वरून शेअर करत असते. सेट वरील ऑफस्क्रीन धमाल, मजेशीर रील,वेगवेगळे फोटोशूट ती तिच्या चाहत्यांच्या भेटीला घेऊन येत असते.आणि तिच्या या मोहक अंदाजामुळे ती कायम प्रेक्षकांच्या नजरेत राहते.तर पूर्वा वेगवेगळे लुक ट्राय करते असते. तिचा निरागसपणा कायमच प्रेक्षकांना भावतो.