अभिनयाकडे जसे मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जाते, अगदी तसेच आजच्या जगात रिलस्टार यांच्याकडेही पाहिले जाते. सोशल मीडियावर निरनिराळा कन्टेन्ट क्रिएट करून ते सगळ्यांच्या मनावर राज्य करतात. महाराष्ट्रात असे काही रिल स्टार आहेत ज्यांनी फक्त प्रेक्षकांनाच नाही तर सगळ्या कलाकार मंडळींवर देखील आपली छाप पाडलीय. त्यांनी स्वतः तयार केलेला कंटेंट वापरून ते नेहमीच रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. अशातच एका रिल स्टारने तयार केलेला व्हिडीओ महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम समीर चौगुले यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.(samir chaughule)
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने साऱ्यांनाच खळखळून हसवले. महाराष्ट्रातील हा असा एकमेव शो आहे ज्याने सगळ्यांच्या टेन्शवरील मात्रा दूर करण्यास कायमच मदत केलीय. या कार्यक्रमातील सगळेच कलाकार एकापेक्षा एक आहेत. या कार्यक्रमातील सगळ्याच पात्रांवर चाहते भरभरून प्रेम करतात. विनोदी शैलीमुळे हे कलाकार प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतात. या कार्यक्रमातील सर्वांचा लाडका असा एक अभिनेता म्हणजे समीर चौगुले. समीर सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतो. नुकतंच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. यांत त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एका रिल स्टारने समीर चौघुले यांची नक्कल केली आहे.
पहा चाहत्याची माफी मागत काय म्हणाला समीर (samir chaughule)
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर समीरही भारावून गेले आणि त्यांनी हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे “रसिकांचं प्रेम” म्हणत शेअर केला आहे. यावर एका चाहत्याने कमेंट करत म्हटलंय, “सर, हे रिल आहे. रिल आहे सर? नाही मला पडलेला हा प्रश्न आहे. हे लोक जितकं तुमचं मनोरंजन करतात, तितकं आम्हीही करतो. मग आम्ही मिमर लोकांनीसुद्धा डोकं लावून व्हिडीओ केला तर ते फक्त बघून मोकळं व्हायचं. आम्हालाच वाईट वाटतं. आमच्या मेहनतीवर पाणी फिरल्यासारखं वाटतं”.(samir chaughule)
====
हे देखील वाचा – ‘मी प्रेमाच्या गोष्टी बोललो’, आणि समोरचा आवाज ऐकून टेलीफोनसकट खाली पडायचा राहिलो…
====
चाहत्याच्या या कमेंटवर समीर यांनी प्रतिउत्तर करत माफी मागितली आहे. समीर म्हणाले, “मी शक्य होईल तितक्या सगळ्यांना रिप्लाय देत असतो. पण तुम्हाला रिप्लाय देणं माझ्याकडून राहून गेलं असेल तर माफ करा. मला डीएम करा”. समीर यांनी कोणतीही तक्रार न करता चाहत्याची नाराजगी समजून घेत त्याची माफी मागितलीय.