Salim Khan Hosptalized : बॉलिवूड विश्वातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामुळे चित्रपटसृष्टीसह चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलीम खान यांना आज सकाळी वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आल्याचे समजते. मात्र, त्यांना नेमकी कोणती तक्रार आहे किंवा प्रकृतीची सध्याची स्थिती काय आहे?, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचा रुग्णालयात जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मिडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये सलमान आपल्या वडिलांची भेट घेण्यासाठी लीलावती रुग्णालयात पोहोचताना दिसतो. या घटनेनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर सलीम खान यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. (Salim Khan Hosptalized)
आणखी वाचा – “चितेतील राख अंगावर लावली” सुप्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला वडिलांच्या निधनानंतर घाटावर घडलेला ‘तो’ प्रसंग
सलीम खान हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत मानाचे नाव आहे. जावेद अख्तर यांच्यासोबतची त्यांची ‘सलीम-जावेद’ ही जोडी बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक ठरली. या जोडीने अनेक अजरामर चित्रपटांची कथा आणि पटकथा लिहिली. ‘शोले’, ‘दीवार’, ‘जंजीर’ आणि ‘डॉन’ यांसारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विक्रमी यश मिळवत भारतीय सिनेमाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद केली. सलीम खान यांच्या प्रकृतीविषयी अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा सध्या सर्वांनाच आहे. त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी चाहत्यांकडून आणि चित्रपटसृष्टीतील कलाकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Salim Khan Hosptalized)





