शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“चितेतील राख अंगावर लावली” सुप्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला वडिलांच्या निधनानंतर घाटावर घडलेला ‘तो’ प्रसंग

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 14, 2026 | 5:32 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sanjay Mishra On Father Death

सुप्रसिद्ध अभिनेत्यानं सांगितला वडिलांच्या निधनानंतरचा'तो' प्रसंग

Sanjay Mishra On Father Death : बॉलिवूडमधील दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे संजय मिश्रा हे सध्या त्यांच्या नव्या ‘वध २’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत नीना गुप्ता यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक भावनिक आठवणी शेअर केल्या. शुभंकर मिश्रा यांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान संजय मिश्रा यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल खुलासा केला. त्यांनी सांगितले की, त्यांचे आणि पत्नी किरण यांचे अरेंज मॅरेज झाले होते.

सुरुवातीला एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ लागला, मात्र पत्नीने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांना कायम साथ दिली. लग्नाच्या काळात अभिनेता सौरभ शुक्ला यांनी दिलेला एक सल्लाही त्यांनी आठवला. त्यांनी स्वतःच्या घरात भाडेकरूसारखे राहण्याचा सल्ला दिला होता, ज्यामुळे वैवाहिक आयुष्यात समतोल राखता येईल असे त्यांनी सांगितले. पत्नी मूळच्या उत्तराखंड मधील दिदीहाट या छोट्या गावातील असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईसारख्या मोठ्या शहरात येताना तिला सुरुवातीला वेगळा अनुभव आल्याचे त्यांनी नमूद केले. संजय मिश्रा यांनी त्यांच्या वडिलांबद्दल बोलताना एक अतिशय भावनिक प्रसंग सांगितला. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी घाटावर जाऊन त्यांना आठवत खूप रडल्याचे त्यांनी सांगितले. (Sanjay Mishra On Father Death)

आणखी वाचा – रामानंद सागर यांच्या लेकाचे निधन, वर्षभरापूर्वीच दुसऱ्या मुलाचे झालेले निधन, सागर कुटुंबावर शोककळा

ते म्हणाले, “मी घाटावर गेलो आणि कोणाची तरी चिता जळत होती. मी चितेतील राख काढली, माझ्या शरीरावर लावली आणि माझ्या वडिलांना हाक मारली. पण राख माझ्या अंगावर असतानाही लोक माझ्यासोबत सेल्फी काढत होते. मी घरी आलो तेव्हा माझ्या सासऱ्यांनी मला पाहिलं आणि त्यांच्या मुलीचं भविष्य पाहिलं. मी त्यांना नमस्कार केला आणि माझ्या ड्रायव्हरनं मला बाथरूममध्ये नेलं आणि मला स्वच्छ केलं. मी खूप भावूक झालो. मी घाटावर माझ्या वडिलांसाठी खूप रडलो.’ त्यांच्या मते, वडिलांना त्यांच्या भविष्याची नेहमीच काळजी होती. त्यांनी त्यांना शिक्षण पूर्ण करण्याचा आणि नोकरी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दरम्यान, ‘ऑल द बेस्ट’, ‘आँखों देखी’, ‘मसान’ आणि ‘गोलमाल’ या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. साधेपणा आणि वास्तववादी अभिनय ही त्यांची खास ओळख मानली जाते. सध्या ‘वध २’ या चित्रपटामुळे ते पुन्हा चर्चेत आले, त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या साध्या आणि भावनिक व्यक्तिमत्त्वाचीही चर्चा होताना दिसत आहे. (Sanjay Mishra On Father Death)

आणखी वाचा – मोठी बातमी! मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅप कोसळला आणि…, एकाचा मृत्यू…

Tags: bollywood newsentertainmentSanjay Mishra On Father Death
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

ankita lokhande vicky jain abu dhabi vacation
Entertainment

हिजाब परिधान करणं सुप्रसिद्ध अभिनेत्रीला पडलं महागात, नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले, “मराठी असूनही…”

मे 29, 2026 | 10:20 am
The Maharashtra Files Marathi Movie
Entertainment

‘द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाचे तांत्रिक अडचणी आणि सेन्सॉर बोर्डाच्या बदलांमुळे प्रदर्शन पुढे, नवीन तारीख लवकरच होईल जाहीर

मे 29, 2026 | 12:00 pm
shashank shende role in ghabadkund
Entertainment

शशांक शेंडे साकारणार रहस्यमय मांत्रिकाची भूमिका, ‘घबाडकुंड’ चित्रपटातील लूकची चर्चा

मे 28, 2026 | 10:01 am
veteran actor ramakant dayama death
Entertainment

‘चक दे इंडिया’ फेम अभिनेत्याचे निधन, वयाच्या ६५व्या वर्षी निधन, सहकलाकाराची भावुक पोस्ट

मे 26, 2026 | 2:16 pm
Next Post
Apurva Nemlekar Wedding

'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीने दुसऱ्यांदा थाटला नवा संसार, 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी बांधली लग्नगाठ, फोटो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.