Apurva Nemlekar Wedding : मराठी मनोरंजनविश्वात सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळतं आहे. गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसले. अशातच सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अपुर्वाने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अपूर्वा हे दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली असून तिच्या लग्नाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे तिने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच म्हणजे १४ फेब्रुवारी रोजी तनुज गोवळकरसह लग्नगाठ बांधली आहे. हिरव्या रंगांची नऊवारी साडी, हातात हिरवा चुडा, आणि गळ्यात मंगळसूत्र या लूकमध्ये अपूर्वा खूपच सुंदर दिसत होती.
तर अपूर्वाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत लिहिलं, “१४ फेब्रुवारी २०२६ अशी एक तारीख जी कायमस्वरुपी आमची झाली. या खास दिवशी आम्ही आमच्या आयुष्यातील जवळच्या लोकांच्या उपस्थितीत एक नवीन अध्याय सुरू केला. मला तुम्हाला हे सांगताना अतिशय आनंद होतोय की, आता मी ‘मिसेस अपूर्वा तनुज गोवळकर’ आहे. आयुष्याने माझी अनेकदा परीक्षा घेतली, यादरम्यान मी अनेक चढउतार अनुभवले आणि तरीही मी प्रेमावर विश्वास ठेवणं कधीही थांबवलं नाही. आयुष्यात एवढी वादळं आली तरीही मी खचले नाही आणि अखेर देवाने माझ्या मनासारख्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या.” “ही आमच्या आयुष्याची दुसरी सुरुवात आहे. समजूतदारपणे आणि अतिशय आदरपूर्वक आम्ही हा निर्णय घेतला आहे. आता या प्रवासात तुम्हा सर्वांचं प्रेम, आशीर्वाद कायम सोबत राहूद्या. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात खंबीरपणे साथ दिल्याबद्दल धन्यवाद. आज मी प्रचंड आनंदी अन् कृतज्ञ आहे. With Love, मिसेस अपूर्वा तनुज गोवळकर.” असं अपूर्वाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Apurva Nemlekar Wedding)
दरम्यान अपूर्वा नेमळेकर ही दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली असून पाहिलं लग्न रोशन देशपांडे यांच्यासह झालं होतं. मात्र त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. यामुळे लवकरच त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर अपूर्वा बरीच वर्ष सिंगल होती. (Apurva Nemlekar Wedding)
आणखी वाचा: मोठी बातमी! मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅप कोसळला आणि…, एकाचा मृत्यू…




