देशभरात सध्या दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी केली जात आहेत. बॉलिवूडमधील कलाकारांच्या घरीही दिवाळी साजरी केली जात आहे. या निमित्त मोठ्या कलाकारांच्या घरी तसेच निर्मात्यांच्या घरी दिवाळी निमित्त वेगवेगळ्या पद्धतीनं आयोजन करण्यात येत असतं. यावेळी ही कलाकारांनी त्यांच्या घरी सोहळ्यांचं आयोजन केलं होतं. सारा अली खाननेही तिच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यात तिने बॉलिवूडमधील खास मित्रपरीवार व स्टार्सना आमंत्रित केलं होतं. त्यातील एक लक्ष वेधून घेणारा पाहुणा ठरला तो म्हणजे अभिनेता कार्तिक आर्यन.(Kartik Aryan reached sara ali khans house for Diwali)
साराने दिवाळीनिमित्त आलिशान पार्टी आयोजित केली होती. त्यात कार्तिकनेही हजेरी लावली. तो छान पारंपारिक अंदाजात पार्टीत पोहोचला. त्यावेळचा त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत कार्तिक पिवळ्या रंगाच्या सदऱ्यात दिसला. त्याबरोबर त्याने पांढऱ्या रंगाचा पायजमा घातला आहे. सणासुदीसाठी त्याचा हा लूक अगदी उठून दिसत आहे. याला जोड म्हणून त्याने कोल्हापूरी चप्पलही घातली होती. त्याचा हा लूक सगळ्यांना बराच आवडला. व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.बऱ्याच नेटकऱ्यांनी कमेंट करत दोन मनं परत जुळत आहेत असे कमेंट करत आहेत. सारा-कार्तिक एकत्र असल्याचं कळताच चाहतेही बरीच खूश झाले आहेत.
आणखी वाचा – अमृता खानविलकरसाठी राज ठाकरेंकडून दिवाळीची खास भेट, गिफ्टमध्ये नक्की काय?
अलीकडेच सारा तिच्या खास मैत्रिणीसह म्हणजेच अभिनेत्री अनन्या पांडेबरोबर करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’च्या ‘सीझन ८’ मध्ये पोहोचली होती. यादरम्यान करणने दोघांनाही त्यांच्या एक्स बॉयफ्रेंडबाबत विचारलं. कार्तिकबरोबरच्या प्रश्नावर सारा म्हणाली होती, तिच्यासाठी हे खूप कठीण होतं. ती कोणत्या परिस्थितीतूप गेली हेही तिने सांगितलं. साराच्या या उत्तरानंतर आता कार्तिकला तिच्या घरी जाताना बघून चाहत्यांनाही प्रश्न पडला आहे.
![](https://marathi.itsmajja.com/wp-content/uploads/2023/11/Screenshot-2023-11-10-181715.png)
खरंतर ब्रेकअपनंतर सारा व कार्तिक यांची भेटीची ही पहिली वेळ नाही. ‘गदर २’ च्या सक्सेस पार्टीदरम्यान हे दोघं एकमेकांबरोबर दिसून आले होते. त्यावेळी दोघांनीही एकमेकांना मीठीही मारली होती. दोघेही गणेशोत्सवाच्यावेळी बाप्पाच्या दर्शनाला एकत्र स्पॉट झाले होते. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना या दोघांच्या नात्याबाबत आणखीनच प्रश्न निर्माण झाले आहेत.