शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्या लग्नात आपली…”, कविता मेढेकरांसाठी शिवानी रांगोळेची खास पोस्ट, म्हणाली, “तुझ्याबरोबर काम करताना…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 13, 2023 | 3:55 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
actress shivani rangole shared birthday special post on her social media for kavita lad medhekar

“माझ्या लग्नात आपली...”, कविता मेढेकरांसाठी शिवानी रांगोळेची खास पोस्ट, म्हणाली, “तुझ्याबरोबर काम करताना...”

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या बरीच चर्चेत आहे. अवघ्या काही दिवसांमध्येच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिकेतील कथानकाबरोबर त्यातील पात्रंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या मालिकेत अभिनेत्री कविता मेढेकर या ‘भुवनेश्वरी’ ही नकारात्मक भूमिका साकारत आहेत. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ भुवनेश्वरची भूमिका साकारणाऱ्या कविता यांचा आज वाढदिवस आहे. कविता यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ऑनस्क्रीन सूनेने म्हणजेच अभिनेत्री शिवानी रांगोळेने एक खास पोस्ट शेअर केली आहे. शिवानीने कविता यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. (Shivani Rangole Shared Post For Kavita Lad Medhekar)


शिवानीने कविता यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिने असं म्हटलं आहे की, “माझ्या लग्नात आपली पहिली भेट झाली. तेव्हाच मी तुला तुझी फॅन असल्याचं सांगून टाकलं आणि आता तुझ्याबरोबर काम करून मला खूप आनंद होत आहे. तुझ्याकडून खूप काही शिकण्याची संधी मला मिळत आहे”. यापुढे तिने “तू पहिल्या दिवसापासून माझी मैत्रीण आहेस” असं म्हणत “आपल्या गप्पांचे कट्टे हे माझे सगळ्यात आवडते आहेत” असंही तिने म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Shivani Rangole Kulkarni (@rangshivani)


आणखी वाचा – “आता राडा होणार”, अखेर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये पुन्हा परतला ओंकार भोजने?, प्रोमो समोर, म्हणाला, “वाटलं तर मी येतो नाहीतर…”

“आपल्याला पुढे एकत्र काम करायचे आहेत” असं म्हणत शिवानीने कविता यांना भरभरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिवानीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टखाली कमेंट करत कविता यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. खऱ्या आयुष्यात शिवानी व कविता या दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी आहेत. त्यांच्यात मैत्रिणींचं नातं आहे. काही दिवसांपूर्वीच शिवानीचा वाढदिवस झाला होता. त्यानिमित्त कविता यांनीही सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली होती.


आणखी वाचा – “आई कुठे…”, फेम प्रसिद्ध अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान कार, फोटो शेअर करत म्हणाली, “यंदाची दिवाळी…”

दरम्यान कविता यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारली आहे. मात्र, त्यांच्या या नकारात्मक भूमिकेलाही प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहेत. नुकत्याच संपन्न झालेल्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायिका आणि सर्वोत्कृष्ट व्यक्तीरेखा हे पुरस्कार मिळाले.

Tags: entertainment newsmarathi actressmarathi entertainmentshivani rangole
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Priya Bapat And Umesh Kamat

"मला फरक पडत नाही कारण…", दिवाळी पाडव्याला नवऱ्याकडून कोणत्याच गिफ्टची अपेक्षा ठेवत नाही प्रिया बापट, म्हणाली, "कोणत्याही सणाला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.