बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटांपेक्षा त्याला येणाऱ्या धमक्यांमुळे अधिक चर्चेत आहे. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यावर आता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने एक पोस्ट लिहिली आहे. लॉरेन्स आपला भाऊ असा उल्लेख केला आहे. तसंच तिने झूमवर कॉल करून बोलायचे आहे. तिला राजस्थानच्या मंदिरात जाऊन पूजा करायची आहे आणि यासाठी सोमीने लॉरेन्सकडे त्याचा मोबाईल नंबरदेखील मागितला आहे. लॉरेन्स बिश्नोईचा फोटो शेअर करताना सोमी अलीने ही मागणी केली आहे. (Salman Khan Ex Girlfriend)
लॉरेन्स बिश्नोईच्या फोटो शेअर करत सोमीने असं म्हटलं आहे की, “हा लॉरेन्स बिश्नोईला थेट संदेश आहे. नमस्कार लॉरेन्स भाऊ. तुरुंगातूनही तुम्ही झूम कॉल करत असल्याचे मी ऐकले आणि पाहिले आहे. त्यामुळे मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे. कृपया मला सांगा मी हे कसे करु शकते? संपूर्ण जगात आमचे आवडते ठिकाण राजस्थान आहे. आम्हाला तुमच्या मंदिरात पूजेसाठी यायचे आहे, पण आधी तुमच्याशी झूम कॉलवर बोलायचे आहे”.
आणखी वाचा – खुशबू तावडेने पहिल्यांदाच शेअर केला लेकीचा सुंदर फोटो, नावही आहे खूप खास, पोस्ट पाहून कौतुकाचा वर्षाव
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “पूजेनंतर काही विषयांवर बोलूया. माझ्यावर विश्वास ठेवा की, हे फक्त तुमच्या फायद्यासाठी आहे. कृपया मला तुमचा मोबाईल नंबर द्या, तुमचे उपकार होतील. धन्यवाद.”. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात असून त्याच्या टोळीतील सदस्यांनी सलमानच्या सर्वात जवळच्या व्यक्तीची म्हणजेच बाबा सिद्दिकीची हत्या केली. त्यानंतर सलमानबरोबर असणाऱ्यांना त्यांच्याकडून धमकीही देण्यात आली आहे.
आणखी वाचा – राधिका आपटे होणार आई, रेड कार्पेटवर बेबी बंप दाखवत दिली गुडन्यूज, कलाकार व चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सोमी अलीने सलमानवर मारहाण आणि फसवणुकीचा आरोपही केला आहे. मात्र जेव्हा सलमानच्या घरावर गोळीबार झाला होता. तेव्हा सोमीने एक पोस्ट शेअर केली होती आणि या पोस्टमध्ये तिने सलमानच्या वतीने बिश्नोई समाजाची माफी मागण्यास तयार असल्याचे लिहिले होते. अशातच तिने पुन्हा एकदा सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने एक पोस्ट लिहिली आहे.