‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेत्री खुशबू तावडे दुसऱ्यांदा आई झाली असून तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. गेल्या वर्षभरापासून ती ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. मात्र अचानक तिनं मालिका सोडली. त्यानंतर ती प्रेग्नंट असल्याचं समोर आलं. खुशबूने ऑगस्ट महिन्यात तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीबद्दल सोशल मीडियावर जाहीर केले होते. त्यावेळी ती झी मराठी वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत काम करत होती. मात्र अभिनेत्रीने आपल्या गरोदरपणासाठी मालिकेतून निरोप घेतला होता. २ ऑक्टोबर रोजी खुशबूची सहअभिनेत्री वैशाली भोसलेने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे खुशबूला मुलगी झाल्याचे म्हटलं होतं. (Khushboo Tawde Daughter Name)
खुशबू तावडेला मुलगी झाल्याच्या गुडन्यूजनंतर तिच्यावर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार व चाहत्यांकडून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. अशातच आता खुशबूने आपल्या लेकीबरोबचा खास फोटो शेअर केला आहे आणि लेकीचे नावही सांगितले आहे. खुशबूने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पती संग्राम साळवी, मुलगा राघव आणि आपल्या गोंडस लेकीबरोबरचा खास फोटो शेअर केला आहे. खुशबूने आपल्या लाडक्या लेकीचे नाव ‘राधी’ असं ठेवलं आहे.
आणखी वाचा – राधिका आपटे होणार आई, रेड कार्पेटवर बेबी बंप दाखवत दिली गुडन्यूज, कलाकार व चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
खुशबूने त्यांचा एक सुंदर असा फॅमिली फोटो शेअर करत “भेटा ‘राधी’, राघवच्या लहान बहिणीला” असं म्हटलं आहे. या फोटोमध्ये खुशबूने आपल्या लेकीच्या चेहऱ्यावर इमोजी लावत चेहरा दाखवलेला नाही. या फोटोमध्ये तिघांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहत असल्याचे दिसत आहेत. खुशबूने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “अभिनंदन”, “खूप प्रेम आणि आशीर्वाद” अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी खुशबूच्या या फोटोला प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय जोडपे आहे. त्यांनी २०१८ साली लग्न केले. तर त्यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये पहिला मुलगा झाला. त्यांच्या या तीन वर्षीय मुलाचे नाव राघव असून नुकतीच खुशबूच्या घरी एका चिमुकलीचेदेखील आगमन झाले आहे. यामुळे तिच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.