Neha Kakkar : सध्या सलमान खान बॉलिवूडमधील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर आहे. बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर मुनव्वर फारुकीचे नावही गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये आले आहे. यानंतर आता बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि तिचा पती गायक रोहनप्रीत सिंग यांनाही व्हिडीओ शेअर करत धमक्या आल्या आहेत. मात्र, इथे नेहा कक्करला धमकावणारी लॉरेन्स बिश्नोई टोळी नसून बाबा बुढा दलाचा निहंग मानसिंग अकाली आहे. नेहाने तिच्या पतीला पडद्याआड ठेवावे आणि लोकांसमोर आक्षेपार्ह कृती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
पंजाबी लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप करत, सोशल मीडियावर चुकीचा मजकूर टाकणाऱ्यांना आधी प्रेमाने समजावून सांगितले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. यानंतर त्यांना दुसऱ्यांदा धडा शिकवला जाईल, त्यासाठी तुरुंगात जावे लागले तरी चालेल. समाजात कोणत्याही प्रकारची अस्वच्छता पसरु दिली जाणार नाही, असेही ते म्हणाले. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या या व्हिडीओमध्ये निहंग मानने म्हटले आहे की, “आता बॉलिवूड गायिका नेहा कक्करची वेळ आहे. कृपया आमचा संदेश नेहा कक्करला द्या की तिने तिच्या पतीला पडद्यामागे ठेवावे. तुम्ही लोकांनी पंजाबचा ताफा उद्ध्वस्त केला आहे. थोडी तरी लाज वाटली पाहिजे, काय वस्तू घेऊन बसला आहात? आम्ही मान्य केले की तुम्ही लोक फिल्मस्टार आणि चांगले गायक आहात, त्यामुळे काही चांगले काम करा आणि तुमचे विचारही चांगले ठेवा. तुम्ही लोक तुमच्या मुलांना काय संस्कार देणार आहात?”.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’नंतर सूरज चव्हाण व पॅडी कांबळेची भेट, एकमेकांना घट्ट मिठी मारली अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल
या व्हिडीओमध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की, “सध्या पंजाबमध्ये ड्रग्ज आणि अश्लीलतेच्या दोन नद्या वाहत आहेत. स्वैराचार करणारा दुसरा कोणी नसून आपलेच सरदार भाई आहेत. पण, ते लोक खरे सरदार नाहीत, तर ते इकडून तिकडे येऊन सरदार झाले आहेत. ज्यांना वडिलोपार्जित मस्तकपद मिळाले आहे ते त्याचा आदर करतात. मला लाहोरचा दरवाजा म्हणतात. बरेच लोक आमच्या रडारवर आहेत. सोशल मीडियावर चुकीचा मजकूर पोस्ट करणाऱ्यांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. सर्वांकडे आमचे लक्ष असते. प्रत्येकाला एकदा प्रेमाने समजावले जाईल आणि दुसऱ्यांदा धडा शिकवला जाईल”.
आणखी वाचा – खुशबू तावडेने पहिल्यांदाच शेअर केला लेकीचा सुंदर फोटो, नावही आहे खूप खास, पोस्ट पाहून कौतुकाचा वर्षाव
अकाली मानसिंग हे सिंह बाबा बुढा दलाचे आहेत. लोकांना मदत करण्यासाठी आणि सोशल मीडियावर असभ्यता, अश्लीलता पसरवणाऱ्या शीख लोकांविरोधात आवाज उठवण्यासाठी तो प्रसिद्ध असल्याचे म्हटले जाते. येथे हे देखील नमूद केले पाहिजे की मानसिंग अकाली यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांचा नंबर देखील जारी केला आहे.