सध्या आमिर खान व जिनिलीया देशमुखच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. गुरुवारी मुंबईत या चित्रपटाचा प्रिमीयर थाटामाटात पार पडला. यावेळी बॉलिवूडमधील दिग्गज मंडळींनी उपस्थिती दर्शवली होती. आमिरने त्याच्या संपूर्ण कुटुंबासह खास पोझ दिल्या. तर त्याची गर्लफ्रेंड गौरी आणि तिचा मुलगा यांनाही आमिरने कॅमेऱ्यासमोर आणलं. आमिरचा हा फोटो तर टॉक ऑफ द टाऊन ठरला. जिनिलीयाही रितेशसह रेडकार्पेटवर आली. यावेळी रितेश जिनिलीयाकडे कौतुकाने पाहत होता. कार्यक्रमात सगळं सुरळीत सुरु असतानाच एक प्रसंग घडला. त्याचाच व्हिडीओ आता समोर आला आहे. (Junaid Khan Salman Khan video)
आमिरच्या नव्या चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी प्रिमीयरला सलमान खानही आला होता. यावेळी तो आमिरला भेटला, गप्पा रंगल्या. सलमान येताच त्याच्याभोवती तुफान गर्दी जमली. पुन्हा एकदा बॉलिवूडचे टॉपचे खान एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र जमले. मात्र यासगळ्यामध्ये आमिरचा लेक जुनैदबरोबर काही भलतंच घडलं. जुनैद सलमानला भेटण्यासाठी पुढे गेला.
सलमान चालत असतानाच जुनैद तिथे गेला. दरम्यान जुनैदकडे सलमानने दुर्लक्ष केलं. इतकंच नव्हे तर त्याच्या बॉडीगार्डने जुनैदला धक्काहे तर त्याच्या बॉडीगार्डने रा्य देत बाजूला काढलं. हा संपूर्ण प्रकार आता कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. सलमानबरोबरच त्याच्या बॉडीगार्डनेही जुनैदला ओळखलं नाही. आता यावरुनच सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या आहेत. सलमानचे बॉडीगार्ड त्याच्या सुरक्षिततेचा विचार करुनच वागतात. मात्र जुनैदबरोबर घडलेला हा प्रकार काही वेगळाच होता.
व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत आपलं मत मांडलं. बॉलिवूडचा तो मोठा किंग खान आहे, आमचा सलमान भाई एकच, जुनैद विकी कौशल बनायचा प्रयत्न करत आहे, सलमानने त्याला बघितलं नाही म्हणून असं घडलं, जुनैदला बॉडीगार्ड्स ओळखत नसतील म्हणून असं घडलं. विकी कौशलबरोबरही एकदा असंच झालं होतं. अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. आमिर-जिनिलीयाचा ‘सितारे जमीन पर’ आता बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे.





