बॉलिवूड स्टार सलमान खान सध्या ‘टायगर ३’ चित्रपट व ‘बिग बॉस’ शोमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या १७व्या सीझनला सुरुवात झाली. ज्यामध्ये तो सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसत आहे. तर ‘टायगर ३’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. अशात सलमान आता एका व्हायरल फोटोमुळे चर्चेत आला. सलमान खानने नुकताच सौदी अरेबिया मध्ये आयोजित एका बॉक्सिंग सामन्याला हजेरी लावली होती. तेव्हा त्याच्याशेजारी सर्वोत्तम फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो व त्याची गर्लफ्रेंड जोर्जिना रॉड्रिग्ज बसले होते. दरम्यान, या दोन दिग्गजांचे एकत्र येण्याचे फोटो व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर सर्वत्र मोठी चर्चा रंगली होती. (Salman Khan & Cristiano Ronaldo in one frame)
सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे नुकतंच टायसन फ्यूरी आणि फ्रान्सिस नगनौ यांच्यात एका बॉक्सिंग सामन्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी रिंगसमोरील पहिल्याच रांगेत सलमान खान, रोनाल्डो आणि त्याच्या गर्लफ्रेंडशेजारी बसलेला दिसला. हे तिघेही एकत्र मॅचचा आनंद घेताना दिसत आहे. तर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रोनाल्डो मॅच पाहण्यात इतका मग्न होता, की त्याने सलमान खानकडे दुर्लक्ष केले. तर आणखी एका व्हायरल फोटोमध्ये, जॉर्जिना रोनाल्डोबरोबर सेल्फी घेताना दिसत असून सलमान सामना पाहताना दिसला.
हे देखील वाचा – नाकात नथ, पारंपरिक साडी अन्…; सुगंधा मिश्राने महाराष्ट्रीयन पद्धतीने केलं ओटीभरण, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल
#SalmanKhan sitting in Front VVIP seat Next to #CristianoRonaldo during #FuryvsNgannou in Saudi Arabia.
— ???????????????????? (@BloodyRahul) October 29, 2023
The sheer Domination of MEGASTAR @BeingSalmanKhan across the GLOBE ????
pic.twitter.com/PL5w9iAXXl
रोनाल्डो आणि सलमान एकाच मंचावर आल्याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहे. एक नेटकरी यावर म्हणाला, “सलमान खान आणि क्रिस्टियानो रोनाल्डो, एक अनपेक्षित क्रॉसओवर.” तर काही नेटकऱ्यांनी अभिनेत्याला ट्रोल केलं आहे. तसेच यावर अनेक मीम्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एकूणच, रोनाल्डो आणि सलमानच्या या फोटोजची बरीच चर्चा रंगत आहे.
हे देखील वाचा – ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला पाहिलंत का?, ‘हरवली आहे’ असं म्हणत शेअर केला फोटो, नेटकरी म्हणाले, “नियतीचा खेळ…”
Legend Cristiano Ronaldo & His Girlfriend Georgina seated next to Megastar Salman Khan ????????????#SalmanKhan #CristianoRonaldo #Tiger3 #Bollywood pic.twitter.com/PA6DcwGN7E
— Vishwajit Patil (@_VishwajitPatil) October 29, 2023
सलमान खानच्या कामाबद्दल बोलायला गेल्यास, तो लवकरच ‘टायगर ३’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यात त्याच्यासह अभिनेत्री कतरिना कैफ व इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे १२ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत चित्रपटाच्या गाण्यांनी आणि ट्रेलरने चांगलाच धुमाकूळ घातला असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.