बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नाकात नथ, पारंपरिक साडी अन्…; सुगंधा मिश्राने महाराष्ट्रीयन पद्धतीने केलं ओटीभरण, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 30, 2023 | 12:05 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
sugandha Mishra ooti bharan ceremony

sugandha Mishra ooti bharan ceremony

 ‘द कपिल शर्मा’ शोमधून खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजे सुगंधा मिश्रा. तर कॉमेडीयन म्हणून ओळखला जाणारा संकेत भोसले हे जोडपं लवकरच आईबाबा होणार आहेत. काही दिवसांपूर्वी ही बातमी सुगंधाने सोशल मीडियावरून चाहत्यांबरोबर शेअर केली होती. आता सुगंधाने तिच्या ओटीभरण्याच्या कार्यक्रमाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या कार्यक्रमातील तिचा महाराष्ट्रीयन खास लूक सध्या सगळ्यांचच लक्ष वेधून घेत आहे.  सुगंधा व संकेत यांची लवस्टोरी २०१७पासून सुरु झाली होती. त्यानंतर या दोघांनी २०२१मध्ये लग्न केलं. करोनाचा काळ असल्यामुळे त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने विवाह सोहळा आटपून घेतला. आता २ वर्षांनंतर हे जोडपं आई-बाबा होणार आहेत. सध्या सुगंधा त्याचा प्रेग्नेंसीचा काळ एन्जॉय करताना दिसते. यासंबंधीत विविध फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. (sugandha Mishra ooti bharan ceremony)

नुकताच तिचा ओटीभरण्याचा कार्यक्रम सोहळा मोठ्या दिमाखाता साजरा झाला.  या संबंधिचे फोटो सुगंधाने स्वतः सोशळ मीडियावर शेअर केले आहेत. मराठमोळ्या अंदाजात अगदी पारंपारिक रितीने या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. लाल व पांढऱ्या रंगाच्या फुलांची खास सजावट करण्यात आली होती. जोडप्यानेही महाराष्ट्रीयन पारंपारिक पोषाख परिधान केला होता. सुगंधाने हिरव्या व लाल रंगाची सिल्क साडी नेसली होती. ज्यावर तिने फुलांनी सजवलेले दागीनेही घातले होते. त्याचबरोबर तिने गोल्डन दागिनेही घातले होते. सुगंधा मराठमोळ्या अंदाजात खूपच सुंदर दिसत होती. तर संकेतने क्रीमी रंगाचा कुर्ता पायजमा व त्यावर केशरी रंगाचं जॅकेट घातलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Sugandhaa S Misshra (@sugandhamishra23)

आणखी वाचा – बाबांचं निधन, आईला कर्करोग अन्…; बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्याची झाली होती अशी अवस्था

हा सोहळा मोठ्या धुमधडाक्यात साजरा झाला. सगळ्यांबरोबर या जोडप्यांनीही चांगलीच धमाल केली. आई-वडिल व जबाबदाऱ्या या अनुषंगाने विविध खेळही यावेळी खेळण्यात आले होते. त्यात मुलांचं डायपर बदलण्यापासून बरेच मजेदार खेळ खेळले गेले. या कार्यक्रमाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत सुगंधा लिहीते,  “आम्ही आमच्या लहान बाळाचं आगमन साजरं करत आहोत.

View this post on Instagram

A post shared by Sugandhaa S Misshra (@sugandhamishra23)

आणखी वाचा – पतीचं निधन, तरुण लेकालाही गमावलं अन्…; पूर्णपणे कोलमडून गेल्या होत्या सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल, तेव्हा काय घडलं होतं?

ओटीभरण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रीयन पद्धतीने सर्व प्रथांनुसार साजरा करण्यात आला. ओटी भरणं, पूजा, बर्फी-पेडा, धनुष्यबाण सारखे मजेदार विधी साजरे केले”. या कार्यक्रमाबद्दल बोलताना सुगंधा म्हणाली, “डायपर बदलण्याची स्पर्धा मी जिंकली. या कार्यक्रमात मी व संकेतने एक गाणंही सादर केलं जे मी लिहिलं होतं. याचं शीर्षक ‘नवीन पाहुणा येणार’, असं आहे”, असं सांगत सुगंधाने आपला आनंद व्यक्त केला.

Tags: Famous comedian actressflaunts baby bump in sareeoti bharan ceremonysugandha mishra
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Salman Khan & Cristiano Ronaldo in one frame

बॉक्सिंग मॅचदरम्यान एकत्र आले पण रोनाल्डोने सलमान खानकडे केलं दुर्लक्ष, बाजूलाच बसला होता पण…; फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.