दिग्दर्शक,अभिनेते नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक नवा इतिहास रचला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीमधील कमाईचे सारे विक्रम मोडले. या चित्रपटामधून आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरु, परश्याची भूमिका साकारणारा आकाश ठोसर आणि परश्याच्या मित्रांच्या भूमिकेतील अरबाज शेख व तानाजी गालगुंडे हे चौघेही विशेष चर्चेत आले. चारही या नव्या कलाकारांच्या सिनेसृष्टीतील प्रवासाला या चित्रपटाने खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. (Arbaj shaikh new business)
‘सैराट’नंतर सल्या या भूमिकेमुळे अरबाजला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्याने पुढेही काही चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. काही दिवसांपूर्वी आलेल्या घर बंदूक बिर्याणी या चित्रपटातही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सोशल मीडियावर अरबाज त्याचा खास मित्र तानाजीबरोबरचे अनेक रील व्हिडीओ शेअर करत असतो. त्यांच्या या रील व्हिडीओला प्रेक्षकांनी भरभरून प्रेमही दिलं आहे. अशा या अभिनेत्याने आता चाहत्यांसह आणखी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.
आणखी वाचा – “हिला अभिनय जमत नाही”, ‘त्या’ व्यक्तीने तेजश्री प्रधानला हिणावलं, म्हणाला, “पूर्ण कॉपी…”
‘सैराट’मधील सल्याने म्हणजेच अभिनेता अरबाज खानने स्वतःचा नवा व्यवसाय सुरु केला असल्याची गुडन्यूज शेअर केली आहे. अरबाजने नव्या व्यवसायाची माहिती दिली असून सैराट फेम रिंकू राजगुरूनेही सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अभिनेत्याला शुभेच्या दिल्या आहेत.
अरबाजने ‘बेक बडीज’ या नावाने स्वतःचं कॅफे सुरु केलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत त्याने त्याच्या नव्या कॅफेची माहिती दिली. उद्या (११ फेब्रुवारी) रोजी या कॅफेचं उद्घाटन होणार आहे. पुण्यातील सिंहगड लॉ कॉलेजसमोर, आंबेगाव बुद्रुक येथे अरबाजने त्याचं नवीन कॅफे सुरु केलं आहे. अभिनयक्षेत्र सांभाळत अरबाज आता व्यवसायक्षेत्रातही कार्यरत आहे.