Saif Ali Khan Attacked : सैफ अली खानवर गुरुवारी झालेल्या हल्ल्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सैफचे संपूर्ण कुटुंब त्याला पाहण्यासाठी रुग्णालयात पोहोचत आहे. तर पोटच्या गोळ्याला आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी सैफची आई शर्मिला टागोरही रुग्णालयात पोहोचल्या. सैफ अली खानवर त्याच्या मणक्याजवळ चाकूने हल्ला करण्यात आला आणि त्याच्या शरीरात सुमारे अडीच इंचाचा चाकूचा तुकडा अडकला. या घटनेत त्याच्यावर सुमारे सहा वार करण्यात आले. त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आता शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं समोर आलं. तब्बल अडीच तासांहून अधिक काळ ही शस्त्रक्रिया सुरु होती.
शर्मिला टागोर सैफला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या आणि या प्रसंगाचा व्हिडीओ सर्वांनाच भावूक करत आहे. आई म्हणून तिला आपल्या मुलाबद्दल असलेली काळजी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तर इब्राहिम अली खानच्या एका व्हिडीओने ही अनेकांची मन जिंकली आहेत. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये इब्राहिम अली खान आणि सारा अली खान वडिलांना भेटून घरी परतताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये इब्राहिमच्या चेहऱ्यावर काळजी व निराशा दिसतेय. वडिलांच्या काळजीने घायाळ झालेला इब्राहिम दिसतोय.
आणखी वाचा – मोठी बातमी! सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला होणार अटक, वांद्रे रेल्वे स्थानकाभोवती फिरताना दिसला अन्…
याआधी सारा अली खान, इब्राहिम, करीना कपूर सतत हॉस्पिटलमध्ये येत धावपळ करताना दिसल्या होत्या. रणबीर कपूर आणि आलिया भट्टही त्याला भेटायला आले होते. याशिवाय करण जोहर, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरही सैफला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तर संजय दत्तनेही करीना कपूर व त्यांच्या लेकांची भेट घेत विचारपूस केली. तर संध्याकाळी सोहा अली खान पती कुणाल खेमूबरोबर हॉस्पिटलमध्ये पोहोचली. यावेळी दोघेही आश्चर्यचकित आणि अस्वस्थ दिसले.
आणखी वाचा – २४ तास उलटल्यानंतर कशी आहे सैफ अली खानची तब्येत? डॉक्टर म्हणाले, “रात्री उशिरा शुद्धीवर आला पण…”
मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीसच्या २० टीम या प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनेच्या काही तासांनंतर, सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोराची एक झलक दिसली ज्यामध्ये तो त्याच्या मागे बॅग लटकवून पायऱ्यांवरुन उतरताना दिसत आहे. सैफ अली खानच्या घरातील आयाने सांगितले की, तो व्यक्ती तिला पहिल्यांदा भेटला आणि त्याने तिच्याकडे एक कोटी रुपयांची मागणी केली.