Saif Ali Khan Attacked : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील चाकू हल्ला प्रकरण विशेष चर्चेत आहे. सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसून एका चोराने हल्ला केला, ज्यात अभिनेता जखमी झाला. सैफवर मुंबईतील लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अभिनेता आता बरा असल्याचं समोर आलं आहे. या सर्व परिस्थितीत पोलीस आरोपींना पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. सैफ राहत असलेल्या इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जिन्यातून खाली उतरताना आरोपीचा चेहरा कैद झाला आहे. मात्र, घटनेला २४ तासांहून अधिक काळ लोटला तरी आरोपीला अटक झालेली नाही. या सर्व प्रकारादरम्यान पोलिसांना आरोपींबाबत मोठा सुगावा लागला आहे.
मुंबई पोलिस सूत्रांनी सांगितले की, संशयित वांद्रे रेल्वे स्थानकाच्या आसपास दिसला. घटनेनंतर संशयिताने पहाटेची पहिली लोकल ट्रेन पकडली असावी. आता मुंबई पोलिसांची पथके वसई, नालासोपारा परिसरात तळ ठोकून आहेत. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या तपासात पोलीस व्यस्त आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी २० पथके तयार केली आहेत. हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी ही पथके विविध ठिकाणी छापे टाकत आहेत.
#BREAKING | सैफ पर हमले की जांच में जुटी पुलिस, पुलिस ने 20 टीमों का गठन किया @romanaisarkhan | @vaibhavparab21 |@MrityunjayNews https://t.co/smwhXUROiK#SaifAliKhanAttacked #Saif #SaifAliKhanAttack #Mumbai pic.twitter.com/VJCy4daTGx
— ABP News (@ABPNews) January 17, 2025
पोलिसांनी सैफच्या रक्तस्त्रावाचा सीसीटीव्ही शोधला होता ज्यामध्ये आरोपीचे छायाचित्र टिपले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पळून जाण्यापूर्वी आरोपीने कपडेही बदलले होते. याप्रकरणी माहिती देणाऱ्यांचीही मदत घेण्यात येत असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर चोरी करण्याच्या कारणाने वांद्रे येथील घरात घुसला होता, असल्याचं सांगितलं.
आणखी वाचा – सैफ अली खानच्या लहान मुलावर हल्ला करण्याचा होता प्रयत्न, मागितलेले एक कोटी, कर्मचारीचा धक्कादायक खुलासा
यावेळी एका आरोपीची ओळख पटली आहे. आता पोलिस इतरांची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मते हल्लेखोर फायर एस्केपच्या म्हणजेच शिड्यांचा वापर करुन १२ मजले चढून घरात घुसला. तसेच आतमध्ये ज्या शिड्यांच्या रस्त्याने घरी घुसला होता त्याच रस्त्याने तो पळून गेला. एका आरोपीला फुटेजमध्ये बघण्यात आले आहे. या हल्ल्याप्रकरणी अनेक खुलासे केले जात आहेत. सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेबाबत कर्मचारी एलियामाने पोलिसांत दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहेत.