गुरूवार, सप्टेंबर 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सैफ अली खानबरोबरच शाहरुख खानवरही हल्ला करण्याचा होता प्लॅन, मोठी माहिती समोर, पोलिसांकडून खुलासा

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 17, 2025 | 12:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
saif ali khan news

सैफवर हल्ला करण्याच्या आधी शाहरुखच्या घरावर होती नजर

गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूड कलाकारांवर हल्ला होण्याचे तसेच धमक्या मिळण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. गेल्या वर्षी सलमान खानच्या घरावर बिश्नोइ गॅंगने गोळीबार केला होता. त्याच्या घराच्या बाल्कनीवर बंदुकीच्या गोळ्यादेखील सापडल्या होत्या. याआधीदेखील अनेकदा सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यानंतर अभिनेता शाहरुख खानलाही धमक्या मिळाल्या होत्या. अशातच गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास अभिनेता सैफ अली खानवर राहत्या घरी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्याच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तो आता सुखरूप असल्याच्या सांगितले आहे. (saif ali khan news)

सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर आता शाहरुखच्या घराबाहेर रेकी केल्याचे वृत्तदेखील समोर येत आहे. ‘आज तक’च्या माहितीनुसार,सैफच्या घरामध्ये घुसण्याआआधी चोराणी १४ जानेवारी २०२५ रोजी शाहरुखच्या घराची रेकी केली होती. मात्र ‘टाइम्स नाऊ’बरोबर साधलेल्या संवादामध्ये यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे सांगितले आहे. तसेच आता पोलिसांनी ३५ जणांची टीम करुन वसई, नालासोपारा या ठिकाणी आरोपींचा शोध सुरु आहे. दरम्यान सैफच्या हल्लेखोराचा कह चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

आणखी वाचा – मोठी बातमी! सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला होणार अटक, वांद्रे रेल्वे स्थानकाभोवती फिरताना दिसला अन्…

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

दरम्यान सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर पूजा भट्टने मुंबईमध्ये सुरक्षित वाटत नसल्यासंदर्भात भाष्य केले होते. तसेच कायदा व सुव्यवस्था यावरदेखील प्रश्न उपस्थित केले आहेत. या सगळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “देशाची आर्थिक राजधानी सुरक्षित करण्यासाठी सरकार पावले उचलणार आहे. मला वाटते की, देशातील मोठ्या शहरांमधील मुंबई हे सर्वात सुरक्षित शहर आहे. काही वेळा अशा घटना घडतात हे खरे आहे आणि त्या गांभीर्याने घ्यायला हव्यात. पण अशा घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे, असे म्हणणे योग्य नाही. यामुळे मुंबईची प्रतिमा मलिन होत आहे. पण शहर सुरक्षित करण्यासाठी सरकार नक्कीच प्रयत्न करेल”.

आणखी वाचा – “मुंबई ‘असुरक्षित’ म्हणणं चुकीचं”, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, “शहर सुरक्षित…”

मुंबई पोलिसांच्या मते, संशयित आरोपीला वांद्रे रेल्वे स्टेशन येथे बघितले गेले आहे. त्याचा तपास आता सर्वत्र सुरु आहे. अभिनेत्याच्या घरी आता तलवार मिळाली आहे. मात्र ही तलवार जुनी असलेली दिसून येत आहे. याचा आता तपास सुरु आहे. ही तलवार कदाचित सैफच्या घरातीलच असू शकते. मात्र कुटुंबाने अजून याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

Tags: bollywood actorsaif ali khanshahrukh khan
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
saif ali khan update

सैफ अली खानवर हल्ला करणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात, वांद्रे पोलिस स्थानकात चौकशी सुरु, प्रकरणाला नवं वळण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.