मंगळवार, एप्रिल 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सातव्या मुलीची…’मध्ये अखेर अस्तिकाचा अंत, मालिकेमधून बाहेर पडल्यानंतर सुरुची अडारकर भावुक, म्हणाली, “इतक्या कमी कालावधीत…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 13, 2024 | 5:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Suruchi Adarkar shared a post about ending her role in Satvya Mulichi Satavi Mulgi serial.

'सातव्या मुलीची…'मध्ये अखेर अस्तिकाचा अंत, मालिकेमधून बाहेर पडल्यानंतर सुरुची अडारकर भावुक, म्हणाली, "इतक्या कमी कालावधीत…"

झी मराठी वाहिनीवरील ‘का रे दुरावा’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे सुरुची अडारकर. ‘का रे दुरावा’ मालिकेत सुरुचीने साकारलेली अदिती खानोलकर ही भूमिका खूपच गाजली होती. यानंतर तिने झी मराठी वाहिनीवरील गाजत असलेल्या मालिकेत एंट्री केली. सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत ती अस्तिकाच्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीला आली.

सुरुची जवळपास आठ वर्षांनी झी मराठी वाहिनीवर पुनरागमन केल्यामुळे तिच्या चाहत्यांना खूपच आनंद झाला. या मालिकेतील तिची अस्तिकाची भूमिका चांगलीच गाजली. मात्र आता या मालिकेत अस्तिकाचा प्रवास संपला आहे. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो समोर आला होता, ज्यात नेत्राच्या हातून अस्तिकाचा अंत झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता सुरुचीने स्वत:ही याबद्दलची अधिकृत माहिती दिली आहे. सुरुचीने तिच्या इन्स्टाग्रामद्वारे याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by ???????????????????????????? N ???????????????????????????? (@suruchiadarkar)

आणखी वाचा – रस्त्यावर मारामारी केली, रागाच्या भरामध्ये सैफ अली खान व भांडणारा व्यक्ती एकमेकांना चावले अन्…; रुग्णालयही गाठावं लागलं कारण…

सुरुचीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे असं म्हटलं आहे की, “काही गोष्टींचा कालावधी कमी असतो पण तो अल्पायुषी नसतो. मी माझ्या ‘अस्तिका’ या पात्राचा निरोप घेत आहे. मला कधीच वाटले नव्हते की मी हे असं पात्र साकारु शकेन. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या टीमबरोबर काम करणे ही माझ्यासाठी पर्वणी होती. या मालिकेच्या शूटिंगदरम्यानच्या सर्व आठवणींसाठी मी नेहमीच कृतज्ञ असेन. इतक्या कमी वेळेतही तुम्ही माझ्या हृदयाचा खूप मोठा भाग व्यापला आहे.  

आणखी वाचा – ‘झलख दिखला जा ११’चं विजेतपद पटकावलं, पण अजूनही मनीषा राणीला मिळाली नाही रक्कम, म्हणाली, “बक्षीसाची रक्कम…”

तसेच यापुढे तिने प्रेक्षकांचे आभार मानत “मायबाप प्रेक्षक, तुमचे विशेष आभार इतकं भरभरून प्रेम दिल्याबद्दल. मी कायम तुमची ऋणी राहीन. असेच कायम आशीर्वाद देत राहा आणि प्रेम करत राहा.” असं म्हटलं आहे. दरम्यान, अस्तिकाच्या पात्राच्या एंट्रीने ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या कथानकाला एक वेगळेच वळण आले होते. रुपाली अस्तिकाच्या मदतीने नेत्रा व अद्वैतचा जीव हेणार होती. मात्र नेत्रानेच अस्तिकाचा अंत केल्यामुळे आता मालिकेच्या कथानकाला आणखी एक वेगळे वळण आले आहे.

Tags: marathi entertainment newsSatvya mulichi satavi mulgiSuruchi Adarkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Tharal Tar Mag Promo

मधुभाऊंनी सायलीला करुन दिली प्रेमाची जाणीव, आता तरी अर्जुन प्रेमाचा स्वीकार करणार का?, कथानकामध्ये वेगळं वळण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.