बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

छोट्या भावाचं निधन तर व्हेंटिलेटरवर आहे बहीण, ‘तारक मेहता…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर, म्हणाली, “आजारपणाचा संघर्ष…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 13, 2024 | 1:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tarak Mehta Ka Ooltah Chashma fame Jennifer Mistry revealed that her younger sister is on ventilator and her brother has passed away

छोट्या भावाचं निधन तर व्हेंटिलेटरवर आहे बहीण, 'तारक मेहता...' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर, म्हणाली, "आजारपणाचा संघर्ष..."

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत रोशन कौर सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री ही गेले काही दिवस चांगलीच चर्चेत आहे. मालिकेच्या निर्मात्यांनी लैंगिक शोषण केल्याच्या बातम्यांमुळे ती चर्चेत आली. अशातच आता ती पुन्हा एकदा तिच्या बहिणीच्या आजारपणावरुन चर्चेत आली आहे. जेनिफर मिस्त्रीची धाकटी बहीण आजारी असून ती व्हेंटिलेंटरवर आहे आणि ती तिच्या जीवन-मृत्यूची लढाई लढत आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम जेनिफर तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींमधून जात आहे. याबद्दल तिने असं म्हटलं की, “माझ्या लहान बहिणीची प्रकृती गंभीर आहे. म्हणूनच मी माझ्या गावी आली आहे. ती सध्या व्हेंटिलेटरवर आहे आणि यावेळी तिला माझी सर्वात जास्त गरज आहे. तिची प्रकृती खूपच  गंभीर आहे आणि ती तिच्या आजारपणाचा संघर्ष करत आहे. अशा परिस्थितीत मला त्याच्याबरोबर राहावे लागत आहे.”

View this post on Instagram

A post shared by Jennifer Mistry Bansiwal????‍♀️♾ (@jennifer_mistry_bansiwal)

आणखी वाचा – “माझे आई व वडील दोघंही आता नाहीत आणि…”, महेश मांजरेकर आई-वडिलांच्या आठवणीत भावुक, म्हणाले, “वाईट वाटतं की…”

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “गेल्या दीड वर्षांपासून माझ्या आयुष्यात खूपच संघर्ष सुरु आहे. माझ्या धाकट्या भावाच्या मृत्यूनंतर मी माझ्या माहेरच्या सात मुलींचा सांभाळ करत आहे. यावेळी असित मोदी प्रकरण घडले. या सर्व गोष्टी एकत्र सांभाळणे माझ्यासाठी खूप अवघड होते. त्यामुळे गेले काही महिने माझ्यासाठी त्रासदायक होते. तसेच तारक मेहता’ सोडल्यानंतर तिला आतापर्यंत कोणत्याही भूमिकेची ऑफर आली नाही. कोणत्याही प्रॉडक्शन हाऊसकडून तिला नवीन रोल मिळाला नाही.”

आणखी वाचा – नेत्राच्या हातून विरोचकाचाही अंत, देवी आईचा संकेत की अजून काही, मालिकेत पुढे काय घडणार?

जेनिफरने काही दिवसांपूर्वी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्याविरुद्ध लैंगिक छळाचा खटला जिंकला होता. न्यायालयाने असित मोदी यांना ५ लाख रुपये भरपाई आणि थकबाकी भरण्यास सांगितले आहे. मात्र असित मोदींनी त्यांना अद्याप या नुकसान भरपाईची रक्कम दिली नाही. त्यामुळे अभिनेत्रीला सध्या अनेक आर्थिक त्रासांतून जावे लागत आहे. याचवेळी ती तिच्या कौटुंबिक समस्यांमधूनही जात आहे.   

Tags: Jennifer mistryJennifer Mistry BansiwalTarak Mehta Ka Ooltah Chashma
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
sanchita ugale passed away
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं टोकाचं पाऊल, घरीच गळफास घेत आत्महत्या, चित्रपटसृष्टीही हादरली

जून 15, 2026 | 2:42 pm
Next Post
vidya balan on nepotism

“इंडस्ट्री कोणाच्याही बापाची नाही”, बॉलिवूडमध्ये काम करण्यावरुन विद्या बालनचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, "माझे काम…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.