शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सैफ अली खानला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षावाल्याला बक्षिस, मिळाली रोख रक्कम कारण…

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 20, 2025 | 4:32 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Saif Ali Khan attacked rickshaw driver who took the injured actor to the hospital who got reward of Rs 11,000

हल्ला झाल्यानंतर जखमी झालेल्या सैफ अली खानला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकाला बक्षीस जाहीर

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवार १५ जानेवारी रोजी पहाटे झालेल्या हल्ल्याने अवघ्या मनोरंजन सृष्टीत खळबळ उडाली. यावेळी सैफ अली खानवर सहा वार करण्यात आले. यापैकी तीन वार हे अत्यंत  गंभीर स्वरुपाचे होते. लिलावती रुग्णालयात न्यूरोसर्जरी आणि प्लॅस्टिक सर्जरीची शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी सैफच्या मणक्यात चाकूचा तुकडा अडकला होता. तो देखील डॉक्टरांनी यशस्वीरित्या काढला असून सध्या सैफची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. सैफच्या या गंभीर अवस्थेमध्ये त्याला एका रिक्षावाल्याची साथ मिळाली आणि यामुळे तो वेळेवर हॉस्पिटलमध्ये जाऊ शकला. ज्या रिक्षामधून सैफला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले त्या रिक्षाचालकाला आता बक्षीस मिळाले आहे. (rickshaw driver got reward)

सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात नेणारा ड्रायव्हर भजनसिंग राणाला ११ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. चालकाच्या सेवेबद्दल एका संस्थेने त्याला बक्षीस देऊन त्याचे कौतुक केले आहे. याआधी त्याने काही वृत्तवाहिन्यांना स्वत:चा अनुभव सांगितला होता. ज्यात त्याने असं म्हटलं होतं की, “सैफच्या पाठीला रक्त लागले होते, रक्त वाहत असल्याने मला खूपच वाईट वाटले. माझ्या रिक्षात सैफ अली खान बसला आहे, याची मला कल्पना नव्हती. कुणीतरी दुखापतग्रस्त व्यक्ती बसलेला असेल, असं मला वाटलं”.

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

आणखी वाचा – Chhaava Movie : विकी कौशलचे ‘छावा’मधील रौद्र रुप समोर, लूकने वेधलं लक्ष, प्रेक्षकांना ट्रेलरची प्रतिक्षा

यापुढे त्याने असं सांगितलं की, “लीलावती रुग्णालयात गेल्यानंतर रिक्षातून ज्यावेळी सैफ आणि त्याचा मुलगा खाली उतरला, त्यावेळी रिक्षात स्टार अभिनेता बसला होता, हे मला कळलं. परिस्थिती पाहून रुग्णालयातील कर्मचारी तातडीने रिक्षाकडे धावले. तोपर्यंत त्यांनाही सैफ अली खान असल्याचे कळाले होते. त्याच्या पाठीतून खूप रक्त वाहत होते”.

आणखी वाचा – Video : Coldplay मध्ये नवरा व वडिलांसह श्रेया घोषालचा धमाल डान्स, गाणं ऐकूनच डोळ्यांत पाणी, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी रविवारी वांद्रे न्यायालयात हजर केले. त्याचे नाव मोहम्मद शहजाद असं असून त्याला न्यायालयाने दिवसांची कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या प्रकरणाला ‘आंतरराष्ट्रीय षडयंत्र सूचित करत आरोपी बांगलादेशचा आहे असं म्हटलं आहे. 

Tags: rickshaw driver got rewardSaif Ali Khan attacked rickshaw driver got rewardsaif ali khan attacked.
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Vivian Dsena First Reaction

"त्याच्या नशिबात ट्रॉफी होती म्हणून…", करणवीर मेहराच्या विजयावर विवियन डिसेनाची प्रतिक्रिया, म्हणाला, "जे काही घडलं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.