बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवार १५ जानेवारी रोजी पहाटे झालेल्या हल्ल्याने अवघ्या मनोरंजन सृष्टीत खळबळ उडाली. यावेळी सैफ अली खानवर सहा वार करण्यात आले. यापैकी तीन वार हे अत्यंत गंभीर स्वरुपाचे होते. लिलावती रुग्णालयात न्यूरोसर्जरी आणि प्लॅस्टिक सर्जरीची शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी सैफच्या मणक्यात चाकूचा तुकडा अडकला होता. तो देखील डॉक्टरांनी यशस्वीरित्या काढला असून सध्या सैफची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. सैफच्या या गंभीर अवस्थेमध्ये त्याला एका रिक्षावाल्याची साथ मिळाली आणि यामुळे तो वेळेवर हॉस्पिटलमध्ये जाऊ शकला. ज्या रिक्षामधून सैफला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले त्या रिक्षाचालकाला आता बक्षीस मिळाले आहे. (rickshaw driver got reward)
सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात नेणारा ड्रायव्हर भजनसिंग राणाला ११ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. चालकाच्या सेवेबद्दल एका संस्थेने त्याला बक्षीस देऊन त्याचे कौतुक केले आहे. याआधी त्याने काही वृत्तवाहिन्यांना स्वत:चा अनुभव सांगितला होता. ज्यात त्याने असं म्हटलं होतं की, “सैफच्या पाठीला रक्त लागले होते, रक्त वाहत असल्याने मला खूपच वाईट वाटले. माझ्या रिक्षात सैफ अली खान बसला आहे, याची मला कल्पना नव्हती. कुणीतरी दुखापतग्रस्त व्यक्ती बसलेला असेल, असं मला वाटलं”.
आणखी वाचा – Chhaava Movie : विकी कौशलचे ‘छावा’मधील रौद्र रुप समोर, लूकने वेधलं लक्ष, प्रेक्षकांना ट्रेलरची प्रतिक्षा
यापुढे त्याने असं सांगितलं की, “लीलावती रुग्णालयात गेल्यानंतर रिक्षातून ज्यावेळी सैफ आणि त्याचा मुलगा खाली उतरला, त्यावेळी रिक्षात स्टार अभिनेता बसला होता, हे मला कळलं. परिस्थिती पाहून रुग्णालयातील कर्मचारी तातडीने रिक्षाकडे धावले. तोपर्यंत त्यांनाही सैफ अली खान असल्याचे कळाले होते. त्याच्या पाठीतून खूप रक्त वाहत होते”.
आणखी वाचा – Video : Coldplay मध्ये नवरा व वडिलांसह श्रेया घोषालचा धमाल डान्स, गाणं ऐकूनच डोळ्यांत पाणी, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी रविवारी वांद्रे न्यायालयात हजर केले. त्याचे नाव मोहम्मद शहजाद असं असून त्याला न्यायालयाने दिवसांची कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या प्रकरणाला ‘आंतरराष्ट्रीय षडयंत्र सूचित करत आरोपी बांगलादेशचा आहे असं म्हटलं आहे.