शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पार्टी, एकांत, आठवणी अन्…; असं होतं सई ताम्हणकरचं जुनं घर, नव्या घरात शिफ्ट होताना रडू लागली अभिनेत्री, म्हणाली, “ज्या घरामध्ये…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 19, 2023 | 5:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Saie Tamhankar First Vlog

पार्टी, एकांत, आठवणी अन्…; असं होतं सई ताम्हणकरचं जुनं घर, नव्या घरात शिफ्ट होताना रडू लागली अभिनेत्री, म्हणाली, "ज्या घरामध्ये…"

अभिनेत्री सई ताम्हणकर हिने काही दिवसांपूर्वी एक खुशखबर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सईने मुंबई शहरातील तीच स्वतःच पहिलं घर विकत घेतलं आहे. नवीन घर घेतल्याचा आनंद शेअर करत सईने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती तिच्या जुन्या घरातील सामान नव्या घरात शिफ्ट करताना दिसली. सईने आजवर दहा घर बदलली असून आता नवं घेतलेल घर हे अकराव घर आहे. आजवर सईने सिनेसृष्टीत बरंच काम केलं आहे. या सगळ्या प्रवासात तिने अनेक चढ उतार पाहिले. (Saie Tamhankar First Vlog)

आजवर आलेल्या संकटाचा सामना करत सईने तिचं मुंबईतलं पहिलं घर विकत घेतलं आहे. इतकी वर्षे सई मुंबईत भाड्यानं राहात होती. सध्या ती ज्या घरात राहतेय. त्या घराबद्दल बोलताना ती भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

आणखी वाचा – “भाड्याच्या घरात राहत होतो पण…”, शर्मिष्ठा राऊतची गणपती बाप्पाने पूर्ण केली ‘ती’ इच्छा, म्हणाली, “गेल्यावर्षी आम्ही…”

आजच्या गणेशोत्सवाच्या खास दिवशी सईने तिच्या युट्यूब चॅनेलचा श्री गणेशा केला आहे. यावर तिने तिचा पहिला व्लॉग शेअर केला आहे. या व्लॉगमध्ये ती तिच्या घरांबद्दल बरच काही बोलताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये बोलताना ती भावुक झालेली दिसली. तसेच तिच्या डोळ्यात पाणी ही आलं. तिच्या या व्लॉग सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून अनेकांनी या व्लॉगला पसंती दर्शविली आहे. सई सध्या भाड्याच्या ज्या घरात राहतेय, त्या घरात तिला मोठे पुरस्कार मिळाले, याच घरात तिनं तिचं मुंबईतलं अलिशान घर बुक केलं, अशा या घरातून पाय निघत नसल्याचं ती म्हणाली, तसेच नवीन घर जरी घेतलं असलं तरी जुन्या घराबरोबर तिला बरंच काही बोलायचं आहे, असंही सई म्हणाली.

आणखी वाचा – …अन् लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी संजय मोनेंवर झाली होती शस्त्रक्रिया, सुकन्या मोने राहिल्या खंबीर, तेव्हा नेमकं काय घडलं होतं?

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

भाड्याच्या घरातून नवीन घरात जात असताना सई म्हणाली, मला क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठं, अवाढव्य घर नको होत, मला फक्त घर हवं होत. त्या घरात आपलं अस्तित्व असलं पाहिजे, इतकंच मला घर घेताना वाटत होत, असं सई म्हणाली.

Tags: entertainmentmarathi actressnew housesaie tamhankar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
adwait dadarkar resigned from zee marathi

"कठोर निर्णय, वाद…", ‘झी मराठी’मध्ये जॉब करत होता अद्वैत दादरकर, राजीनामा दिल्यानंतर म्हणाला, "जास्त अपयशच आलं आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.