अभिनेत्री सई ताम्हणकर हिने काही दिवसांपूर्वी एक खुशखबर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सईने मुंबई शहरातील तीच स्वतःच पहिलं घर विकत घेतलं आहे. नवीन घर घेतल्याचा आनंद शेअर करत सईने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती तिच्या जुन्या घरातील सामान नव्या घरात शिफ्ट करताना दिसली. सईने आजवर दहा घर बदलली असून आता नवं घेतलेल घर हे अकराव घर आहे. आजवर सईने सिनेसृष्टीत बरंच काम केलं आहे. या सगळ्या प्रवासात तिने अनेक चढ उतार पाहिले. (Saie Tamhankar First Vlog)
आजवर आलेल्या संकटाचा सामना करत सईने तिचं मुंबईतलं पहिलं घर विकत घेतलं आहे. इतकी वर्षे सई मुंबईत भाड्यानं राहात होती. सध्या ती ज्या घरात राहतेय. त्या घराबद्दल बोलताना ती भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
आजच्या गणेशोत्सवाच्या खास दिवशी सईने तिच्या युट्यूब चॅनेलचा श्री गणेशा केला आहे. यावर तिने तिचा पहिला व्लॉग शेअर केला आहे. या व्लॉगमध्ये ती तिच्या घरांबद्दल बरच काही बोलताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये बोलताना ती भावुक झालेली दिसली. तसेच तिच्या डोळ्यात पाणी ही आलं. तिच्या या व्लॉग सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून अनेकांनी या व्लॉगला पसंती दर्शविली आहे. सई सध्या भाड्याच्या ज्या घरात राहतेय, त्या घरात तिला मोठे पुरस्कार मिळाले, याच घरात तिनं तिचं मुंबईतलं अलिशान घर बुक केलं, अशा या घरातून पाय निघत नसल्याचं ती म्हणाली, तसेच नवीन घर जरी घेतलं असलं तरी जुन्या घराबरोबर तिला बरंच काही बोलायचं आहे, असंही सई म्हणाली.
भाड्याच्या घरातून नवीन घरात जात असताना सई म्हणाली, मला क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठं, अवाढव्य घर नको होत, मला फक्त घर हवं होत. त्या घरात आपलं अस्तित्व असलं पाहिजे, इतकंच मला घर घेताना वाटत होत, असं सई म्हणाली.