मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

…अन् लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी संजय मोनेंवर झाली होती शस्त्रक्रिया, सुकन्या मोने राहिल्या खंबीर, तेव्हा नेमकं काय घडलं होतं?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 19, 2023 | 3:38 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Anand Ingale On Sanjay Mone

…अन् लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी संजय मोनेंवर झाली होती शस्त्रक्रिया, सुकन्या मोने राहिल्या खंबीर, तेव्हा नेमकं काय घडलं होतं?

सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या मैत्रीची उदाहरणे आजही दिली जातात. यांत बोलायचं झाल्यास अभिनेते संजय मोने व आनंद इंगळे यांच्या मैत्रीबद्दल बोलणं वावगं ठरणार नाही. आनंद इंगळे यांना मुंबईत आल्यावर घरात राहायला जागा देण्यापर्यंतची त्यांची घनिष्ठ मैत्री आहे हे फार कमी जणांना ठाऊक असेल. संजय मोने व आनंद इंगळे यांनी दोन स्पेशल या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांच्यातील या मैत्रीचं खरं रूप समोर आलं. आनंद इंगळे व संजय मोने यांच्यात रंगलेल्या गप्पा फारच रंजक होत्या. आनंद इंगळे यांना जेव्हा सुकन्या मोने यांच्याबद्दल विचारलं तेव्हा आनंद इंगळे यांनी सांगितलेला किस्सा ऐकून सुकन्या मोने यांचं नव्याने कौतुक करावंसं वाटेल. पडद्यावर एक अभिनेत्री म्हणून त्यांचा अभिनय पाहताना त्यांची हुशारी, त्यांचा जबाबदारपणा कळतो तितकाच त्यांचा खरेपणा हा त्यांच्या रोजच्या जीवनातही आहे. (Anand Ingale On Sanjay Mone)

दोन स्पेशल या कार्यक्रमात, संजय मोने म्हणजे बेभान, वादळी व्यक्तिमत्व या व्यक्तिमत्वाचा सांभाळ करताना सुकन्या मोने यांची काय तारांबळ उडते असा प्रश्न विचारला असता यावर आनंद इंगळे यांनी एक किस्सा सांगितला. खरंच हा किस्सा ऐकून सुकन्या मोने यांचं करावं तितकं कौतुक कमीच म्हणावं लागेल. आनंद इंगळे म्हणाले, “संजय व सुकन्यामध्ये सुकन्या जास्त काळजी घेणारी आहे. आणि खूप खमकीही आहे. सुकण्याच्या या स्वभावामुळे आजवर संजयने बऱ्याच गोष्टी निभावून नेल्या आहेत”. यावर मान डोलावत संजय मोने यांनी, “शंभर टक्के” असंही म्हटलं.

आणखी वाचा – दुसरीमध्ये असताना काढलेल्या गणपतीच्या चित्राचा फोटो हेमांगीने केला शेअर, म्हणाली, “चित्रकार व्हायचं ठरवलेलं पण…”

यापुढे बोलताना आनंद इंगळे म्हणाले की, “संजयची लग्नानंतर पहिल्या वर्षी बायपास झाली. म्हणजे संजयच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी संजय रुग्णालयात होता, आणि सुकन्या त्याच्याजवळ होती. या सगळ्या प्रकारात, या सगळ्या आलेल्या संकटात संजयला ज्याप्रकारे सुकन्याने संभाळलंय याचं कौतुक व्हायलाच हवं. असं नाही आहे की त्यांच्यात वाद होत नाहीत, त्यांची भांडण होत नाहीत, तेवढंच त्यांचं एकमेकांवर प्रेमही आहे. संजयसमोर मी आज असंही बोलेन की, संजयसोबत एकत्र राहायचं काकणभर जास्त गुण हे सुकन्याला जातात”.

आणखी वाचा – सुबोध भावेच्या लेकांनी गणपतीसाठी बनवला ‘चांद्रयान’चा देखावा, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक

यावर बोलताना संजय मोने म्हणाले की, “मी समाजात कसं वावरायचं हे सगळं काही सुकन्या बघते. अगदी माझ्या घरचे नातेवाईक ते कोण आहेत, काय आहेत हेदेखील मला सुकन्याकडून कळतं”, असं म्हणत संजय यांनी सुकन्या यांचं कौतुक केलं.

Tags: anand ingaleentertainmentsanjay monesukanya mone
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
angha atul start new business

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच सुरु करणार स्वतःचं हॉटेल, गणपतीनिमित्त केली घोषणा, म्हणाली, "उद्योजिका म्हणून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.