Komal Kumbhar Boyfriend: ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले.या मालिकेला आणि मालिकेतील प्रत्येक कलाकारला प्रेक्षकांना तितकचं प्रेम दिल. ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.शेवटचे काही भाग प्रेक्षेपित होत आहेत. तर १००० भागांचं सेलिब्रेशन देखील नुकतंच पार पडलं. तेव्हा सर्वच कलाकार भावुक झालेलं पाहायला मिळाले. या मालिकेला आणि मालिकेतील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षक तितकंच मिस करणार आहेत.(Komal Kumbhar Boyfriend)
या मालिकेतील पडद्यावरील प्रत्येक जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. त्यात अंजी आणि पश्याच्या नात्यामध्ये अनेक उतार-चढाव पाहायला मिळाले. त्यामुळे अंजी आणि पश्याच्या नात्यामुळे अनेकदा मालिकेत रंजक वळण पाहायला मिळाली. पंरतु आपल्या पडद्यावरच्या लाडक्या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराविषयी जाणून घेण्यात कायमच प्रेक्षकांना उत्सुकता असते.
पाहा कोमलच्या बर्थ डे सेलिब्रेशनची खास झलक (Komal Kumbhar Boyfriend)
सध्या अनेक कलाकार जोडप्यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. काहींचा साखरपुडा देखील पार पडला पश्या म्हणजेच अभिनेता आकाश नलावडे काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला तर आता प्रेक्षकांची लाडकी अंजी म्हणजेच अभिनेत्री कोमल कुंभारने देखील तिच्या प्रेमाची कबुली देत चाहत्यांना खुशखबर दिली आहे.कोमलने तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या बर्थ डे सेलिब्रेशनचा स्पेशल व्यक्ती सोबतचा एक खास व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे.
गोकुळ दशवंत सोबत कोमल रिलेशनशिप मध्ये असल्याची कबुली कोमलने या व्हिडिओच्या मार्फत दिली आहे . गोकुळने गुडघ्यावर असून कोमलला लग्नाची मागणी घातली . तसेच हैप्पी बर्थडे च्या बोर्डवर हैप्पी बर्थ डे बायको असे देखील लिहलेले आहे.तर गोकुळ हा अभिनेता,दिग्दर्शक व लेखक आहे. कोमलच्या या व्हिडिओवर अभिनेत्री साक्षी गांधीने congraulations म्हणत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तर चाहत्यांनी देखील कोमलवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.