सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Ketaki Mategaonkar : “आपल्याच लोकांना मराठी गाणी माहित नसतात”, केतकी माटेगांवकरचा संताप, म्हणाली, “साऊथ चित्रपटांमधील गाणं…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 2, 2023 | 7:02 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Ketaki Mategaonkar spoke on Marathi Songs

Ketaki Mategaonkar spoke on Marathi Songs

छोट्या पडद्यावरील ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’ या सिंगिंग शोमधून घराघरात पोहोचलेली केतकी माटेगावकर आज मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या गायिकांमध्ये ओळखली जात आहे. गायनाबरोबर केतकी उत्तम अभिनेत्रीसुद्धा असून तिने आजवर केलेल्या अनेक चित्रपटांमध्ये आपला अभिनयाची छाप पाडली आहे. शिवाय तिच्या ग्लॅमरस लूकमुळेच ती महाराष्ट्रातील असंख्य तरुणांची क्रश बनली आहे. (Ketaki Mategaonkar)

गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर अभिनय क्षेत्रात काम करण्याबरोबर अनेक ठिकाणी गायनाचे कार्यक्रमही करत असते. तिच्या या कार्यक्रमांना नेहमीच प्रतिसाद मिळतो. शिवाय ती सोशल मीडियावर फारच सक्रिय असून तिच्या फोटोशूट्सची नेहमीच चर्चा होत राहते. अशातच केतकीने मराठी गाण्यांना मिळणाऱ्या कमी प्रतिसादासोबत संताप व्यक्त करताना मराठी गाण्यांच्या मार्केटिंगबद्दल स्पष्टच बोलली आहे.

काय म्हणाली केतकी माटेगावकर ? (Ketaki Mategaonkar on Marathi Songs)

View this post on Instagram

A post shared by Ketaki Mategaonkar (@ketakimategaonkar)

केतकी माटेगावकर म्हणाली, “आपलेच लोक मराठी गाणी ऐकायला तयार होत नाहीत. तेच जर साऊथमधील एखादं गाणं आलं की, डोक्यावर घेतलं जातं. जेव्हा माझं ‘प्रियकरा…’ गाणं आलं तेव्हा हे साऊथमधलं कोणतं गाणं आहे? असं विचारलं, त्यावेळेस मला धक्काच बसला. आपल्याच लोकांना नवी मराठी गाणी माहीत नसतात, त्यांचीही काही जबाबदारी असते. सगळ्याच गाण्यांवर थिरकता येत नाही, तर काही गाणी फक्त लक्षात ठेवली जातात.”

“आज प्रसिद्धीची अनेक माध्यमं असूनही त्यात मराठी गाणं झाकोळलं गेलंय. मी रसिकांना मराठी गाण्यांबाबत ‘अपडेट’ राहण्याची विनंती करते. शिवाय निर्मात्यांसह सिनेमाच्या सगळ्या टीमनेही ही गाणी रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य मार्केटिंग केलं पाहिजे”, असं केतकी म्हणाली. (Ketaki Mategaonkar on Marathi Songs)

अभिनेत्री केतकी माटेगावकर लवकरच ‘अंकुश’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Ketaki Mategaonkar)

Tags: ketaki mategaonkarmarathi songstrending
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Next Post
Sharad Ponkshe on Marathi Directors

"दिग्दर्शक,निर्मात्यांसोबत खूप भांडणं झाली कारण..." शरद पोंक्षेनी केला खुलासा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.