गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सचिन मोटेंनी बायकोसोबत पाहिलंय हे स्वप्न

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 13, 2023 | 10:13 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Sachin Mote and Wife Dream

Sachin Mote and Wife Dream

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम गेली दोन वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. जणू हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईतच बनला आहे. हास्यजत्रेने आजवर रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. कित्येक कुटूंबांना आजही महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहिल्याशिवाय घास जात नाही. हा कार्यक्रम पडद्यावर आपण पाहतो त्यातील स्किट्स पाहतो, त्यावेळी या स्कीटमागे घेतल्या जाणाऱ्या अपार कष्टांची मेहनतीची आपल्याला जाणीवही सेटवरील मंडळी भासू देत नाहीत. (Sachin Mote and Wife Dream)

कलाकार मंडळींमुळे हा कार्यक्रम अव्वल ठरत असला तरी यामागे दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञ यांची मेहनत विसरून चालायचं नाहीच. पडद्यामागे राहून पडद्यावरील कलाकारांना हसवण्यासाठी हसवणाऱ्या कलाकार मंडळींमध्ये एक नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे लेखक सचिन मोटे.

लेखक निर्माते सचिन मोटे यांचं लवकरच आणखी एक स्वप्न सत्यात उतरणार आहे. हे स्वप्न म्हणजे सोनी मराठी वाहिनीवर येत असलेली जोडीदारासोबत पाहिलेल्या स्वप्नांची गोष्ट म्हणजेच ‘तुजंमाजंसपान’ ही आगामी मालिका होय. बरं या मालिकेच्या प्रोमोसोबाबत सध्या सचिन मोटे आणि त्यांची पत्नी मेघा मोटे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये सचिन आणि मेघा यांनी एकत्र पाहिलेलं स्वप्न नेमकं काय आहे याचा उलगडा केला आहे.(Sachin Mote and Wife Dream)

सचिन मोटे आणि त्यांची पत्नी मेघा मोटे यांनी एकत्र पाहिलेलं स्वप्न समोर आलंय. यांत त्यांनी म्हटलंय की, आम्ही दोघांनी एकत्रित पाहिलेलं स्वप्न म्हणजे आपल्या आवडत्या माणसांसोबत आनंदाने एकत्र राहणं. आणि ते बऱ्यापैकी पूर्णही झालं आहे. दरम्यान बऱ्याच अडचणी आल्या मात्र दोघांनी सांभाळून आणि सॉरी बोलून ती प्रत्येक वेळ निभावून नेली. यावेळी बोलताना दोघांनाही एकमेकांच्या आवडत्या सवयींबद्दलही भाष्य केलं. सचिन यांनी पत्नीबद्दल बोलताना सांगितलं की, हिच्याकडे उत्तम व्यवस्थापन आहे. (Sachin Mote and Wife Dream)

एखादी गोष्ट यशस्वी करण्यात तिचा हातखंडा आहे. तर सचिन यांच्याबद्दल बोलताना त्यांची पत्नी म्हणाली की, सचिन बद्दल सांगायचं म्हणजे त्याचा पॉसिटीव्हनेस मला आवडतो. लग्न झाल्यापासून मी एक शब्द ऐकत आलेय ते म्हणजे होईल गं. दोघांनीही एकमेकांचं कौतुक करत त्यांच्या यशस्वी झालेल्या आगामी स्वप्नाबाबत प्रेक्षकांना माहिती दिली आहे.

Tags: entertainmentits majjamaharashtrachi hasy jatramaharshtrachi hasyajtramarathi malikamarathi serialmegha motemhjsachin motesony marathituz maz sapantuzmazsapan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
Next Post
Bhau Kadam Struggle Story

वडिलांच्या निधनानंतर आलेली ती वेळ निभावणं कठीण होत!तरीही भाऊ कदम थांबले नाहीत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.