विनोदाचं कमाल टायमिंग, आणि सादरीकरण ज्याला चोख जमतं तो म्हणजे अभिनेता भाऊ कदम,फु बाई फु, चला हवा येऊ द्या या शो मधील भाऊच्या सादरीकरणाने भाऊ कदम हे नाव घराघरात पोहचलं.पांडू, टाईमपास, मधू इथे अन चंद्र तिथे या आणि अशा अनेक चित्रपटातून भाऊ कदमने मोठ्या पडद्यावर ही त्यांच्या कामाची छाप पाडली.तसेच रंगभूमीवर भाऊच करून गेलो गाव हे नाटक देखील जोरदार सुरु आहे.(Bhau Kadam Struggle Story)
कलाकाराच्या नावाला ओळख मिळाली, प्रसिद्धी मिळाली की प्रेक्षकांचं असा समज असतो, की कलाकारांचं आयुष्य फार छान असत. परंतु प्रत्येकाचा आपला आपला असा एक प्रवास असतो.आणि त्या वाटेमध्ये अनेक अडथळे देखील असतात.आणि अभिनेता होण्याच्या या प्रवासातच एक उत्तम कलाकार घडत असतो.
जाणून घ्या काय आहे भाऊ कदमचा अभिनेता होण्याचा प्रवास? (Bhau Kadam Struggle Story)
भाऊ कदमचा देखील अभिनेता होण्याचा प्रवास सोप्पा नव्हता.भाऊंचे बालपण,शिक्षण हे सर्व वडाळ्यात पार पडले. परंतु वडिलांचं अचानक निधन झाल्यामुळे वडाळ्याच घर त्यांना सोडावं लागलं. वडिलांचं छत्र अचानक हरपल्यामुळे कुटुंबावर काय वेळ येते ही कल्पना ही करवत नाही.वडाळ्याच घर सोडल्यानंतर भाऊ आणि त्यांचं कुटुंब डोंबिवली मध्ये राहायला गेले.सुरुवातील आर्थिक गरज म्हणून भाऊने मतदार नोंदणीच काम केलं.(Bhau Kadam Struggle Story)
या कामाने काही भागात नव्हतं, त्यानंतर भाऊ कदम आणि त्याच्या भावाने मिळून एक पण टपरी सुरु केली. त्याने घर खर्चाला हातभार लागला. हे सगळं सुरु असतानाच भाऊ त्याची अभिनयाची आवड देखील जोपासत होता. नाटकाच्या माध्यमातून भाऊचा अभिनेता म्हणून प्रवास सुरु झाला.समोर आलेल्या परिस्थितीवर मात करून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा आणि प्रेक्षकांचा लाडका भाऊ कदम होण्याचा प्रवास डोळे पाणवणारा होता.
हे देखील वाचा : ‘सध्या भाऊ माझ्या पालकांच्या जागेवर’ओंकारने शेअर केला भाऊ कदम यांच्यासोबतचा अनुभव