मराठी चित्रपटसृष्टीतलं सगळ्यात लोकप्रिय जोडपे सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. कित्येक चित्रपटात त्यांनी पती पत्नी म्हणून एकत्र काम केलं. वयात असणाऱ्या अंतराला झुगारून त्यांनी आपला संसार यशस्वी करून दाखवला. अशातच आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. सुप्रिया आणि सचिनच्या लग्नाला ४० वर्षे झाली आहेत. दोघेही सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. याच लग्नाच्या वाढदिवसानिमित त्यांनी हटके सेलिब्रेशन केलं आहे आणि याची खास झलक त्यांची मुलगी श्रियाने आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. (Sachin and Supriya Pilgaonkar wedding anniversary)
आपल्या नानाविध भूमिका व अभिनयाने चर्चेत राहणारी श्रिया सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक स्टायलिश फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अभिनेत्रीने तिच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सचिन-सुप्रिया पिळगावकर ‘सपनों में मिलती है’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. व्हिडीओत दोघांची केमिस्ट्री आणि रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये सचिन-सुप्रिया अगदी बेभान होऊन डान्स करत आहेत. “लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा… तुम्ही जन्मालाच सुपरस्टार म्हणून आला आहात. नच बलिये सीझन १ चे विनर”, असं कॅप्शन श्रियाने सचिन-सुप्रिया यांच्या डान्सची खास झलक शेअर केली आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स् करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी या व्हिडीओखाली कमेंट्स करत सचिन व सुप्रिया पिळगांवकरांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
दरम्यान, सचिन पिळगांवकर व सुप्रिया पिळगांवकर यांनी १९८५ साली लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला ३९ वर्ष झाली आहेत. त्यांना श्रिया पिळगांवकर ही एकुलती एक मुलगी आहे. सचिन-सुप्रिया यांनी ‘अशी ही बनवाबनवी’, ‘माझा पती करोडपती’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘नवरा माझा नवसाचा’ अशा अनेक चिटपटांमधून काम केलं आहे. तर आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत श्रियादेखील कलाविश्वात सक्रीय आहे.