टेलिव्हिजनवरील ‘द कपिल शर्मा’ हा कार्यक्रम अधिक लोकप्रिय झाला होता. या कार्यक्रमाने अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यामधून प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा अधिक प्रकाशझोतात आला. सध्या तो ओटीटीवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये दिसून येत आहे. या शोमध्ये अनेक कलाकार येण्यासाठी उत्सुक असतात. मात्र एका कवीने या शोमध्ये येण्यासाठी स्पष्ट नकार दिला आहे आणि ही कवी म्हणजे सुरेंद्र शर्मा. सुरेंद्र शर्मा हे कवी असण्याबरोबरच अभिनेतेही आहेत. अलीकडेच त्यांनी कॉमेडियन कपिल शर्माबद्दल भाष्य केले. (Surendar Sharma on Kapil Sharma)
सुरेंद्र शर्मा यांना कपिल शर्माबरोबरच्या मतभेदाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, “जेव्हा कपिल प्रसिद्ध नव्हता तेव्हा त्याने माझ्याबरोबर अनेक शो केले आहेत. कपिल शर्माला हसवण्यासाठी काही लोकांची गरज आहे. मला त्याची गरज नाही. त्यांनी मला त्यांच्या शोसाठी बोलावले पण मी गेलो नाही. मी त्याला सांगितले की, तो इतका कमावत असला तरीही मला मोबदला हवा आहे”.
यापुढे ते म्हणाले की, “कपिल शर्मा शोमध्ये येण्याने माझी लोकप्रियता वाढेल असे त्याने मला सांगितले आणि मी तसे करण्यास नकार दिला. शोच्या निर्मात्यांनीही माझ्याशी संपर्क साधला होता. पण मी गेलो नाही. कपिलला कॉमेडी येत नाही असे मी म्हणत नाही, पण त्याचा अभिनय टिकवून ठेवण्यासाठी त्याला काही ३-४ लोकांच्या पाठिंब्याची गरज असते. जेणेकरून तो त्यांच्याबद्दल बोलू शकेल. पण कॉमेडीसाठी तो एकटा उभा राहू शकत नाही, हे माझं म्हणणं आहे”.
आणखी वाचा –
दरम्यान, सुरेंद्र शर्मा यांनी आजवर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘करम’ आणि ‘पट्टन की बाजी’ यांसारखे हे त्यांचे काही प्रसिद्ध हिंदी चित्रपट आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक नाटके लिहिली आहेत जी आजही संस्मरणीय आहेत. त्यांनी केवळ नाटके लिहिली नाहीत तर त्यात अभिनयही केला आहे. तसंच ते त्यांच्या अनोख्या विनोद शैलीसाठी आणि कवितांसाठी ओळखले जातात.