गेली अनेक वर्ष आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अलका कुबल. एक आदर्श सून म्हणून त्यांची मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलका कुबल यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सोशल मीडियावरून त्या चाहत्यांशी संपर्कात असतात. त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणा-या महत्त्वाच्या घडामोडी त्या चाहत्यांची शेअर करत असतात. (Alka Kubal daughter ishani)
अलका कुबल यांना दोन मुली आहेत. पण आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात न येता त्या दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. काही वर्षांपूर्वीच त्यांची मोठी मुलगी ईशानी पायलट झाली. आता ती वैमानिक म्हणून कार्यरत आहे. तिच्याचबद्दलची एक पोस्ट अलका यांनी नुकतीच सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे.
अलका कुबल यांनी नुकतीच आपली लेक ईशानी वैमानिक असलेल्या विमानाने प्रवास केला आहे आणि याची खास झलक त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. लेकीबरोबरचा फोटो शेअर करत त्यांनी “आजच्या फ्लाइटसाठी माझी कॅप्टन” असंही म्हटलं आहे आणि या फोटोमध्ये दोघींच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. त्याशिवाय अलका कुबल यांच्या चेहऱ्यावर आनंद, कौतुक व अभिमान असे भाव पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – 22 December Horoscope : वृषभसह ‘या’ राशींसाठी सुखसमृद्धीचा योग, जाणून घ्या रविवारचा दिवस कसा असेल?
अलका कुबल यांनी शेअर केलेल्या या फोटोला त्यांच्या चाहत्यांनी तसंच अनेक कलाकारांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अमेय वाघ, सुकन्या मोने, पल्लवी पाटील, चैत्राली गुप्ते, ऋजुता देशमुख, हेमंत ढोमे यांसारख्या अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत अलका कुबल यांच्या लेकीचे कौतुक केलं आहे.
आणखी वाचा – “I Love You Leela” म्हणत एजेंनी दिली प्रेमाची कबुली, लीला काय उत्तर देणार? रोमॅंटिक प्रोमो समोर
दरम्यान, अलका कुबल यांनी मोठी मुलगी ईशानी आठल्ये हिला लहानपणापासून विमानाची आवड… याच आवडीतून तिने वैमानिकाचे शिक्षण घेतले. त्यासाठी तिने विशेष परिश्रमही घेतले. तिचे हे परिश्रम फळाला आले असून ती आता यशस्वी व्यावसायिक विमान पायलट झाली आहे.