०४ डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियरला झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनने पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे. अल्लू अर्जुनने या घटनेबद्दल सांगितले की, ‘ही एक दुर्दैवी घटना आहे आणि खरे सांगायचे तर यात कोणाचीच चूक नाही. सरकारचा मी खरोखर आभारी आहे कारण त्यांनी चित्रपटसृष्टीला खूप पाठिंबा दिला आहे. इथे एक गैरसमज आहे. कृपया माझ्या चारित्र्यावर शंका घेऊ नका. मी तसा माणूस नाही”. (Allu Arjun on Hyderabad Sandhya Theater stampede case)
यापुढे अभिनेता म्हणाला, “मी २१-२२ वर्षांच्या मेहनतीनंतर हा सन्मान मिळवला आहे. मला एवढेच सांगायचे आहे की मी माझ्या आयुष्यातील तीन वर्षे या चित्रपटात गुंतवली आहेत. माझ्याकडे अशीही माहिती आहे की, मी तिथे परवानगीशिवाय गेलो होतो, जे अजिबात खरं नाही. मी परवानगी घेतली होती आणि मगच तिथे गेलो होतो. माझ्या डोळ्यासमोर पोलिसही होते. त्यांनीच मला तिथे जाण्याचा मार्ग दिला होता.
#WATCH | Hyderabad, Telangana: On December 4th Sandhya Theatre incident, Actor Allu Arjun says, "…It is an unfortunate incident and frankly speaking, it is nobody's fault. I am actually very grateful to the government because they have given a lot of support to the film… pic.twitter.com/8a5jW2ty77
— ANI (@ANI) December 21, 2024
आणखी वाचा – 22 December Horoscope : वृषभसह ‘या’ राशींसाठी सुखसमृद्धीचा योग, जाणून घ्या रविवारचा दिवस कसा असेल?
अल्लू अर्जुन पुढे म्हणाला की, “पोलिसांच्या सूचनेनुसार मी तिथे गेलो आणि जर परवानगी नसेल आणि त्यांनी मला परत जाण्यास सांगितले असते. मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे, त्यामुळे मी त्याचे पालन केले असते. मला अशी कोणतीही माहिती देण्यात आली नाही आणि म्हणून मी त्यांच्या सूचनांचे पालन करत होतो. म्हणून मी आत गेलो. हा रोड शो किंवा मिरवणूक नव्हती. थिएटरच्या बाहेर गर्दी होती आणि मी फक्त ओवाळले, कारण जेव्हा शेकडो लोक तुम्हाला भेटायला येतात तेव्हा हा मूलभूत आदर असतो”.
दरम्यान, या प्रकरणी अल्लू अर्जुन आणि थिएटर व सिक्युरिटी एजन्सीच्या विरोधात निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्लू अर्जुनला पोलिसांनी १३ डिसेंबरला अटक केली होती. कोर्टात त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अल्लू अर्जुनने तुरुंगात एक रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची जामिनावर सुटका झाली.