झी मराठी वरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे हे मुख्य भूमिकेत पहायला मिळत आहेत.तर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या मालिकेत खलनायिकेची भूमिका पार पाडत आहे. नेत्रा, अद्वैत आणि रुपाली अशी त्यांच्या भूमिकांची नाव आहेत. (Saatvya Mulichi Saatvi Mulgi)
वेगळे कथानक ही या मालिकेची जमेची बाजू आहे.सध्या मालिकेत रुपाली इंद्रायणीचा वापर करून नेत्राचा काटा काढण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु पडद्यावर हेच एकमेकांच्या विरोधात कट कारस्थान करणारे लोक पडद्यामागे मात्र एकमेकांशी खूप चांगलं बॉण्डिंग शेअर करतात.
पहा काय आहे तितिक्षाची पोस्ट ? (Saatvya Mulichi Saatvi Mulgi)
नुकतेच या मालिकेचे २०० भाग पूर्ण झाले आहेत. नेत्रा म्हणजे अभिनेत्री तितिक्षा तावडेने सहकलाकारांसोबतचा ट्रेंडिंग गाण्यावरच रील शेअर केलं आहे. या रीलला, सातव्या मुलीची सातवी मुलगी, मालिकेचे २०० भाग यशस्वीपणे पूर्ण झाले आहेत. आणि हे खास सादरीकरण त्या लोकांसाठी, जे आम्हला एवढ प्रेम देत आहेत. सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका पाहत रहा. असे, कॅप्शन देत तिने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. (Saatvya Mulichi Saatvi Mulgi)
हे देखील वाचा : तितिक्षा आणि ऐश्वर्याची पडद्यामागची धमाल
तसेच २०० भाग विशेष म्हणजे अभिनेता सिद्धार्थ बोडके याने तितिक्षाला खास भेट दिली आहे. तिचा नेत्राच्या कॅरेक्टर मधला फोटो असणार कप भेट म्हणून दिला आहे. त्यावर ‘happy 200 netra’ असे देखील लिहिले आहे. सिदार्थ आणि तितिक्षा झी मराठी वरील तू अशी जवळी राहा या मालिकेत एकत्र पहायला मिळाले होते. मालिकेतील सर्व कलाकारांच्या अभिनयातील सहजतेने मालिकेला चान्गले यश मिळत आहे.