चित्रपट येतात जातात मात्र चित्रपटातील गाणी ही कायम प्रेक्षक गुणगुणत असतात. चित्रपट हिट ठरो वा ना ठरो चित्रपटातील गाणी मात्र चित्रपट पाहण्यापूर्वीपासूनच प्रेक्षकांच्या दिलाचा ठोका चुकवितात. मराठी, हिंदी गाणी प्रेक्षक आवर्जून ऐकतात. त्यात भर घालत जसा काळ पुढे सरतोय त्यानुसार या गाण्यांवरील रिल्स अधिक लक्षणीय ठरतात. सध्या सर्वत्र एकाच गाण्यावर रील्स बनत आहेत ते गाणं म्हणजे ‘बहरला मधुमास’. ‘बहराला मधुमास’ हे गाणं सध्या ट्रेंडिंगमध्ये असून या गाण्याची भुरळ साऱ्या प्रेक्षक वर्गांमध्ये पाहायला मिळतेय. लहानांपासून मोठ्यापर्यंत ते भारतासोबत इतर देशातही या गाण्याने साऱ्यांना थिरकायला सज्ज केलं आहे.(Trending Song Viral)
‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट येत्या २८ एप्रिल ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहे. शाहीर साबळे यांच्या जीवनपटावर भाष्य करणारा हा चित्रपट असून शाहिरांच्या आयुष्यातील बरेच किस्से, गाणी या चित्रपटात प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहेत. शाहीर साबळेंच्या भूमिकेत अभिनेता अंकुश चौधरी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातली ‘बहरला मधुमास’ हे गाणं चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवतंय यांत शंकाच नाही.
तांजानियामध्ये ही बहरला मधुमास (Trending Song Viral)
हे गाणं सना केदार शिंदे आणि अंकुश चैधरी यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. कोरियोग्राफर कृती महेश हिने हे गाणं कोरियोग्राफ केलं असून तिची या गाण्यातील हुकस्टेप सगळ्यांच्या मनावर राज्य करतंय. ही हुकस्टेप इतकी व्हायरल झाली आहे की, तांजानियाच्या किली पॉल आणि त्याच्या बहिणीलाही या गाण्याची भुरळ पडली आहे.(Trending Song Viral)
किली पॉल आणि त्याच्या बहिणीने बहरला मधुमास या गाण्यावर नृत्य केला असून किली ची बहीण निमा या गाण्यावर ‘बहरला मधुमास’ या गाण्याची हुकस्टेप करताना दिसतेय. किली आणि निमाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अंकुश चौधरी, सना शिंदे, केदार शिंदे या कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. शाहिरांच्या चित्रपटातील शाहिरी बाज असलेल्या या गाण्याची भुरळ किली आणि निमाला झालीय. भाषा वेगळी असली तरी संगीताच्या प्रेमापोटी या दोघांनी चक्क या गाण्याचे लिपसिंग केलं आहे.(Trending Song Viral)
हे देखील वाचा – ‘हृदयी वसंत फुलताना….’ पुन्हा दोन मित्रांची झाली भेट
‘बहरला मधुमास’ या नव्या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच इंस्टाग्रामवरही या गाण्याचे हजारोंमध्ये रिल्स व्हिडीओ बनले आहेत. या गाण्याचे संगीत दिग्दर्शक म्हणून अजय अतुल यांनी बाजू सांभाळली आहे.