Mazya Gharachi Goshta : प्रत्येक व्यक्तीला वाटतं की, आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं. त्यासाठी त्या व्यक्तीला अनेक प्रक्रियेतून सामोरे जावं लागतं. घर शोधणे, कागदपत्रांची जुळवाजुळव, घराचे हफ्ते व अन्य या प्रक्रियेतून सर्वच जण जातात. मात्र, यादरम्यान येणाऱ्या अडचणींनाही सामोरं जावं लागतं. पण कुटुंबाचा पाठिंबा, संयम आणि सकारात्मकता आपण जर बाळगली, तर निश्चितच घराची स्वप्ने पूर्ण होतात. (Rutuja Bagwe advice to girls who dreams their own house)
मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवेने तिच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण केला असून नुकतीच ती तिच्या नव्या घरी शिफ्ट झाली. ‘इट्स मज्जा’च्या ‘माझ्या घराची गोष्ट’मध्ये ऋतुजाच्या घराची झलक दाखवली. त्यावेळी ‘इट्स मज्जा’शी बोलताना ऋतुजाने स्वतःच्या घराची स्वप्न बघणाऱ्या मुलींना मोलाचा सल्ला दिला आहे.
हे देखील वाचा – कोकणची शान नेहा पाटील ठरली ‘ढोलकीच्या तालावर’ची विजेती; मिळवला ‘महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी’चा बहुमान
यावेळी ऋतुजा म्हणाली, “मी कोणाला उपदेश देण्याइतपत मोठी नाही. पण घर घेण्याच्या प्रक्रियेतून मी जे काही शिकले. त्यातून एवढंच सांगेन की, घराची गुंतवणूक खूप मोठी आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला आधीपासूनच तयार ठेवा. पूर्ण तयारी असल्याशिवाय यात उडीच घेऊ नका. सर्वात महत्वाचं म्हणजे आई-वडिलांचा सल्ला घ्या आणि आपली माणसं जवळ ठेवा. कारण घर घेण्यामध्ये आई-बाबांचा पाठिंबा सगळ्यात महत्वाचा असतो. त्याचबरोबर आपली माणसं जेव्हा आपल्याबरोबर असतात, तेव्हा आपण स्वतः सकारात्मक राहतो. शिवाय ते आपल्या पाठीशी असल्यामुळे आपण बिंधास्तपणे लढायला बाहेर जाऊ शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे, स्वतःवर विश्वास ठेवा आणि संयम राखा. कारण जर आपण संयम राखल्यास तर आपले स्वप्न कुठल्याही वेळेत पूर्ण होऊ शकतात.” असं सल्ला ऋतुजाने दिला आहे.
हे देखील वाचा – Video : ‘रईस’ फेम अभिनेत्री माहिरा खान दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात, अभिनेत्रीला पाहताच नवरदेवाला अश्रू अनावर, व्हिडिओ व्हायरल
अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने आजवर अनेक मालिका, नाटक व चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. तिने प्रत्येक माध्यमांमध्ये साकारलेल्या भूमिकांचे भरभरून कौतुक झाले. तिचे ‘अनन्या’ हे प्रचंड गाजलं होतं. याशिवाय तिने वेबसिरीजमधूनही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सध्या तिच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स असून या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या ‘अंकुश’ चित्रपटात ती महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.