शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कोकणची शान नेहा पाटील ठरली ‘ढोलकीच्या तालावर’ची विजेती; मिळवला ‘महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी’चा बहुमान

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 2, 2023 | 11:28 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Dholkichya talavar winner neha patil

Dholkichya talavar winner neha patil

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाचा काल मोठ्या दिमाखात महाअंतिम सोहळा पार पडला. त्याबरोबर अखेर महाराष्ट्रला २०२३ची नवी लावणी सम्राज्ञी मिळाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लावणी नृत्यांगनांनी यंदाचं ‘ढोलकीच्या तालावर’चं हे पर्व चांगलंच गाजवलं. उत्तम लावणी, दिलखेच अदा, पुणेरी ठसका असा अदांचा मिलाप यंदाच्या पर्वात पाहायला मिळाला. सुरुवातीपासूनच या स्पर्धकांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत होती. पण महअंतिम फेरीपर्यंत समता आमणे, नम्रता सांगुळे, पूर्वा साळेकर, तनुजा शिंदे, शुभम बोराडे आणि नेहा पाटील या लावण्यवती टिकून राहिल्या. मात्र या सहा स्पर्धकांमधून कोकणकन्या नेहा पाटील हीने बाजी मारत यंदाच्या ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाचा विजेता होण्याचा मान पटकावला आहे. (Dholkichya talavar winner neha patil)

सुरुवातीपासूनच आपल्या मनमोहक अदाकारीने नेहाने सगळ्यांची मनं जिंकली.  आपल्या जबरदस्त नृत्य कौशल्याच्या जोरावर सगळ्यांना घायाळ करत तिने ‘ढोलकीच्या तालावर’ हा किताब आपल्या नावावर केला. तर शुभम बोराडे या स्पर्धेचा प्रथम उपविजेता ठरला व नम्रता सांगुळे ही द्वितीय उपविजेता ठरली.

View this post on Instagram

A post shared by @colorsmarathi

आणखी वाचा – Video: “लहानपणी ही तू सुरातच रडायचास…”, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर सागर कारंडे घेऊन आला सुरेश वाडकरांसाठी खास व्यक्तीचं पत्र

नेहा पाटीलच्या या स्पर्धेतील प्रवास सगळ्यांच्या लक्षात राहण्यासारखा होता. तिची कलेप्रती निष्ठा, कौशल्य, लावणी तंत्रावरील तिचं प्रभुत्व यामुळे स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिचा प्रत्येक परफॉर्मन्स तिच्या परिपूर्णतेचं उदाहरण देत होता. तिने पारंपारिक लावणीला जपत आधुनिकतेचा तडका देत नवीन आविष्कार केले. तिने आपल्या अनोख्या नृत्यशैलीतून सगळ्यांची मनं जिंकत अखेर लावणी सम्राज्ञीचा मान पटकावला.

View this post on Instagram

A post shared by @colorsmarathi

आणखी वाचा – “तुम्ही खाली का बसलात?” जुई गडकरीच्या फोटोशूटवर चाहत्याची कमेंट, अभिनेत्रीने दिलं उत्तर, म्हणाली, “माणसाने…”

‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाच्या परिक्षणाची जबाबदारी अभिनेत्री क्रांती रेडकर, सुप्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते व लेखक अभिजित पानसे आणि ऩृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांच्याकडे होती. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाविजेता अभिनेता अक्षय केळकर याने केलं. आपल्या वेगळेपणातून त्याने या कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेलं.  

Tags: dholkichya talavarfirst runner upgrand finaleLavani dance showneha patilshubham boradewinner
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Mahira Khan Second Marriage

Video : 'रईस' फेम अभिनेत्री माहिरा खान दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात, अभिनेत्रीला पाहताच नवरदेवाला अश्रू अनावर, व्हिडिओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.