बॉलिवूडमधील यशस्वी व लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे कंगना रनौत. कंगनाने आजवर बऱ्याच चित्रपटात काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकताच तिचा ‘चंद्रमुखी २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक होत आहे. आता ती ‘तेजस’ या चित्रपटातून रुपेरी पडदा गाजवण्यासाठी येत आहे. नुकतंच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ‘तेजस’ चित्रपटाचा टीझर शेअर केला. (kangana ranaut tejas movie teaser out)
हा चित्रपट भारतीय हवाई दलाची पायलट तेजस गिल यांच्या जीवनावर आधारीत आहे. खरतर हा चित्रपट २०२२ मध्येच प्रदर्शित होणार होता. पण काही कारणांमूळे हा चित्रपट लांबणीवर पडत गेला. अखेर या चित्रपटाचा पहिला टीझर समोर आला असून यात कंगना हवाई दलाच्या युनिफॉर्ममध्ये पाहायला मिळत आहे.
चित्रपटात कंगनाने पायलट तेजस गिल यांची भूमिका साकारली असून ती या भूमिकेत जबरदस्त अंदाजात दिसत आहे. “प्रत्येक गोष्ट बोलण्याची गरज नाही. आता आमने-सामने येण्याची वेळ आली आहे. आता आभाळातून पाऊस नव्हे तर आग येण्याची गरज आहे. भारत को छेडोगे तो छोडेंगे नही”, अशा दमदार बॅकग्राउंड आवजातील हा टीझर सध्या बराच चर्चेत आहे. या चित्रपटातील कंगनाचा अॅक्शन अवतार अंगावर शहारे आणणारा आहे. तिचा हा अंदाज प्रेक्षकांच्या बराच पसंतीस पडताना पाहायला मिळत आहे.
हा चित्रपट २७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधी चित्रपटाचा ट्रेलर भारतीय वायुसेना दिनी म्हणजेच ८ ऑक्टोबरला रिलीज होईल. या चित्रपटाच्या पहिली झलक पाहता कंगनाच्या चाहत्यांना या चित्रपटाबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. नुकताच कंगनाचा ‘चंद्रमुखी २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील तिच्या भूमिकेचं सगळीकडून कौतूक होत आहे. शिवाय ती आता ‘इमरजेंसी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत पाहायला मिळेल. चित्रपटात तिच्यासह श्रेयस तळपदे, अनुपम खेर देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.