बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तीन दिवस लाईट नाही, नेटवर्क नाही; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या जुळ्या मुली आई-वडिलांसह अडकल्यात हिमाचलला, म्हणाली, “पावसाने…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 5, 2025 | 1:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
rubina dilaik family and twin daughters

तीन दिवस लाईट नाही, नेटवर्क नाही; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या जुळ्या मुली आई-वडिलांसह अडकल्यात हिमाचलला, म्हणाली, "पावसाने…"

rubina dilaik family and twin daughters : हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. ब्यास नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने कुल्लू-मनाली महामार्ग चक्क वाहून गेला आहे, ज्यामुळे वाहतूकीला मोठा फटका बसला आहे. नदीकाठच्या हॉटेल आणि इमारतींना धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हिमाचल प्रदेशसह, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या शहरांनाही मोठा फटका बसला आहे. दरम्यान, पावसाचे आक्राळविक्राळ रुप पाहायला मिळत असून अनेक कुटुंब यांत अडकले आहेत. गेले तीन चार दिवस तिथे वीज खंडित आहे. शिवाय नेटवर्कचाही मोठा प्रॉब्लेम सुरु आहे. यांत एका सेलिब्रिटी कपलचे कुटुंबही अडकले. अभिनेत्रीने याबाबत व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे.

हे सेलिब्रिटी कपल म्हणजे अभिनेत्री रुबिना दिलैक आणि अभिनेता अभिनव शुक्ला. रुबिना ही मूळची हिमाचल प्रदेशची आहे. तिचे आई-बाबा, आजी आणि आता तिच्या जुळ्या मुलीही हिमाचल प्रदेशलाच राहतात. सध्या रुबिना आणि अभिनव कामानिमित्त बाहेर आहेत. अशातच पावसाने घातलेल्या थैमानाने तिचे आई, बाबा आणि तिच्या जुळ्या मुली या हिमाचल प्रदेशलाच अडकल्या आहेत. हवामानामुळे फ्लाईट सतत रद्द होत असल्याने रुबिना व अभिनवलाही मुलींपर्यत पोहोचता येत नाही आहे.

आणखी वाचा – Video : गावातल्या मंडळींसमोर भजन गाण्यात मग्न झालाय प्रसाद खांडेकर, अभिनेत्याच्या संस्कारांचं कौतुक, कोकणातील घराची दिसली झलक

View this post on Instagram

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “चार दिवसांपासून माझंच कुटुंब हिमाचलमधील आमच्या फार्म हाऊसवर आहे. माझे आई-वडील, माझ्या दोन्ही मुली आणि आजी एवढेच तिथे राहत आहेत. तीन दिवसांपासून फार्म हाऊसवर वीज नाही. नेटवर्क नाही. सगळे सुरक्षित आहेत; पण ज्या परिस्थितीतून ते सगळे जात आहेत. त्यावर आपण फक्त प्रार्थनाच करु शकतो. मला इथे बसल्या बसल्या सतत चिंता लागलेली असते. दोन आठवड्यांपासून मी आणि अभिनव आमची फ्लाईट रिशेड्युलवर रिशेड्यूल करीत आहोत; पण आम्हाला तिथे पोहोचण्याची संधीच मिळत नाही आहे. १५ दिवसांपूर्वी जेव्हा मी गेले होते तेव्हा मी स्वतः तीन दिवस अडकले होते”.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’च्या सेटवर जुईची आवडती व्यक्ती कोण?, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “आम्ही दोघी…”

पुढे ती म्हणाली, “हिमाचल, पंजाबमध्ये जी परिस्थिती आहे, त्यात अनेक लोक कठीण परिस्थितून जात आहेत हे मी समजू शकते. मी देवाकडे फक्त प्रार्थना करु शकते की, सगळ्यांना सुरक्षित ठेव. सोशल मीडियावरुन जर फंड गोळा करायचा असेल, तर तेही मी करेन. मला हेच सांगायचं आहे की, मी आणि माझं कुटुंबही या परिस्थितीचा सामना करीत आहे. आपण या नैसर्गिक आपत्तीतून बाहेर पडू आणि सगळे सुरक्षित राहू दे हीच प्रार्थना. ज्यांचं नुकसान झालं आहे, त्या कुटुंबांबद्दल मला सहानुभूती आहे”.

Tags: rubina dilai family daughtersrubina dilaiktelevision actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
Prathamesh Parab wife Kshitija Ghosalkar

"ट्रोलिंग करणं सगळ्यात सोपी गोष्ट", प्रथमेश परबच्या पत्नीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, म्हणाली, "खूप गरजेचं आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.